'आप'च्या २७ आमदारांच्या चौकशीचे निवडणूक आयोगाला आदेश

By admin | Published: October 14, 2016 08:31 PM2016-10-14T20:31:17+5:302016-10-14T20:31:17+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. या सर्व आमदारांचे सदस्य रद्द करण्याबाबतची मागणी राष्ट्रपती

Order of Election Commission to inquire 27 AAP candidates | 'आप'च्या २७ आमदारांच्या चौकशीचे निवडणूक आयोगाला आदेश

'आप'च्या २७ आमदारांच्या चौकशीचे निवडणूक आयोगाला आदेश

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 14 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. या सर्व आमदारांचे सदस्य रद्द करण्याबाबतची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर त्यांनी निवडणूक आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील या २७ आमदारांना केजरीवाल सरकारने संसदीय सचिवपद दिले आहे. या आमदारांनी लाभाचे पद स्वीकारल्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, या आमदारांना वेगवेगळ्या रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
दरम्यान, या सर्व आमदारांचे सदस्य रद्द करण्याबाबतची तक्रार एका विभोर आनंद  नावच्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने केली होती.
 

Web Title: Order of Election Commission to inquire 27 AAP candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.