शेतकऱ्यांचा अवमान करणारे विधान केल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:29 PM2020-10-09T23:29:37+5:302020-10-09T23:31:05+5:30
Kangana Ranaut News : शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कंगना राणौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधील तुमकूर येथील एका न्यायालयाने दिले आहेत.
बंगळुरू - कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कंगना राणौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधील तुमकूर येथील एका न्यायालयाने दिले आहेत. वकील रमेश नाईक यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी क्याथासांद्रा पोलीस ठाण्यातील पोलिसांना कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने सांगितले की, तक्रारदारांनी सीआरपीसी कलम १५५(३) अंतर्गत अर्ज करून तपासाती मागणी केली आहे. नाईक हेसुद्धा क्याथासांद्र येथील रहिवासी आहेत. त्यांनी कंगनाविरोधात गुन्हेगारी खटल्याबाबत सांगितले की, न्यायालयाने अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पोलीस ठाण्याला कंगनाविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
Karnataka court directs police to register FIR against actress #KanganaRanaut over her tweet allegedly targeting farmers protesting against #FarmLaws
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2020
केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनास सुरुवात केली होती. त्यानंतर कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगना रानौत हिनेट्विटमध्ये दहशतवादी संबोधल्याचा आरोप झाला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती.