वैष्णोदेवी मंदिरात रोज 50 हजार भाविकांनाच दर्शन, वाढत्या गर्दीमुळे हरित लवादाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 02:45 PM2017-11-13T14:45:27+5:302017-11-13T14:49:57+5:30

राष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश दिला आहे.

Order of Green Arbitration for Visiting 50,000 pilgrims daily at the Vaishno Devi Temple | वैष्णोदेवी मंदिरात रोज 50 हजार भाविकांनाच दर्शन, वाढत्या गर्दीमुळे हरित लवादाचा आदेश

वैष्णोदेवी मंदिरात रोज 50 हजार भाविकांनाच दर्शन, वाढत्या गर्दीमुळे हरित लवादाचा आदेश

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश दिला आहे. . राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार आता एका दिवसात  50 हजार भाविकांनाच वैष्णोदेवीचे दर्शन घेता येणार आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय हरित लवादाने वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार आता एका दिवसात  50 हजार भाविकांनाच वैष्णोदेवीचे दर्शन घेता येणार आहे. सोमवारीपासूनच हा आदेशा लागू करण्यात आला आहे. वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गर्दी पाहता राष्ट्रीय  हरित लवादाने हा निर्णय दिला आहे. जर दर्शनासाठी 50 हजारापेक्षा जास्त लोक आली तर त्यांना अर्धकुवारी किंवा कटरा जवळ थांबविलं जाणार आहे. याशिवाय वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात कोणतेही बांधकाम न करण्याच्या सूचनादेखील हरित लवादाने केल्या आहेत. वैष्णोदेवी परिसरात कोणत्याही परिस्थितीत 50 हजारांपेक्षा जास्त लोक पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच हरित लवादाने भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी 50 हजारांपेक्षा जास्त भाविक आले तर त्यांना अर्द्धकुंवारी किंवा कटरा येथेच थांबवण्यात यावं. वैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता ५० हजार इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त भाविकांना दरबारात जाण्याची परवानगी दिली तर ते धोकादायक ठरु शकते. म्हणूनच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत,’ असं हरित लवादाने म्हटलं आहे. 

वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापन समितीने २४ नोव्हेंबरपर्यंत भाविकांसाठी नवा रस्ता खुला करावा, असंही हरित लवादाने सांगितलं आहे. नवा रस्ता फक्त बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आणि भाविकांसाठी असेल, असंही लवादाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Order of Green Arbitration for Visiting 50,000 pilgrims daily at the Vaishno Devi Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.