फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी क्षेत्रीय समित्यांची स्थापना महापालिका आयुक्तांचे आदेश ; अनधिकृत जाहिरातबाजीला बसणार लगाम

By admin | Published: February 2, 2015 11:52 PM2015-02-02T23:52:55+5:302015-02-02T23:52:55+5:30

पुणे : शहरातील अनधिकृत फ्ल्केसबाजीला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार, महापालिकेकडून शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नागरिकांच्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच दिले असून या समित्या तत्काळ स्थापन करण्यात येणार आहे. या समित्या प्रामुख्यांने क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणा-या प्रभागांमधील अशा प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्या बरोबरच प्रभागांमध्ये जनजागृतीची जबाबदारीही बजाविणार आहेत.

Order of Municipal Commissioner to set up regional committees to prevent Flexibility; Burden for unauthorized advertising | फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी क्षेत्रीय समित्यांची स्थापना महापालिका आयुक्तांचे आदेश ; अनधिकृत जाहिरातबाजीला बसणार लगाम

फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी क्षेत्रीय समित्यांची स्थापना महापालिका आयुक्तांचे आदेश ; अनधिकृत जाहिरातबाजीला बसणार लगाम

Next
णे : शहरातील अनधिकृत फ्ल्केसबाजीला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार, महापालिकेकडून शहरात 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नागरिकांच्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच दिले असून या समित्या तत्काळ स्थापन करण्यात येणार आहे. या समित्या प्रामुख्यांने क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणा-या प्रभागांमधील अशा प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्या बरोबरच प्रभागांमध्ये जनजागृतीची जबाबदारीही बजाविणार आहेत.
महानगरांमधील अनधिकृत जाहिरातफलक, बोर्ड, बँनर्स तसेच जाहिरातीं विरोधात सातारा येथील सुराज्य फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्यात सुनावणीत या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉर्डस्तरिय नागरिकांच्या समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या अनधिकृत जाहिरातबाजीच्या कारवाईचेही नियंत्रण करणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून संबधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग समिती अध्यक्ष असणार आहेत. तर सचिव म्हणून संबधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख महापालिका सहायक आयुक्त असणार आहेत. याशिवाय या समितीत सदस्य म्हणून उच्च न्यायालयाकडून निर्देशित करण्यात आलेले वकील, स्वयंसेवी संस्थेचा एक सदस्य, संबधित क्षेत्रीय कार्यालयाचा परवाना निरिक्षक आणि पुणे आऊटडोर अँडव्हरटायझिंग असोसिएशनमधील एका सदस्यांचा समावेश असणार असल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली.
महिन्याभरात 16 हजार जाहिरातींवर कारवाई
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर, आकाशचिन्ह विभागाकडून शहरात मोठया प्रमाणात या अनधिकृत जाहिराती काढण्यावर भर देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात तब्बल 16 हजार 184 जाहिराती काढण्यात आल्या असून 9 10 जणां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 6 होर्डींग्ज, 4690 बोर्ड, 4335 बँनर्स, 1494 फ्लेक्स, 370 झेंडे, 3997 पोस्टर, 30 किऑक्स, तर इतर 952 इतर स्वरूपाच्या जाहिराती आहेत.

Web Title: Order of Municipal Commissioner to set up regional committees to prevent Flexibility; Burden for unauthorized advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.