रेल्वे रूळावरील प्रदुषणाच्या सर्वेक्षणाचे आदेश
By admin | Published: November 5, 2015 11:30 PM2015-11-05T23:30:27+5:302015-11-05T23:30:27+5:30
पुणे : प्रवासादरम्यान रेल्वे रूळावर पडणार्या मानवी विष्टेमुळे होणार्या प्रदुषणाबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने भारतीय पर्यावरण निर्देशक दिल्ली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले गुरूवारी दिले.
Next
प णे : प्रवासादरम्यान रेल्वे रूळावर पडणार्या मानवी विष्टेमुळे होणार्या प्रदुषणाबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने भारतीय पर्यावरण निर्देशक दिल्ली, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले गुरूवारी दिले. रेल्वे रुळांवरील विष्टेमुळे होणार्या प्रदुषणाबाबत ॲड. असिम सरोदे यांच्यामार्फत न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रेल्वे विभागात तसेच रेल्वेमध्ये बायो टॉयलेट उभारले गेले आहेत का नाही याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश न्या. विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. कॅग अहवालानुसार भारतातील रेल्वे रूळांवर दररोज ३९८० मेट्रीक टन एवढी मानवी विष्टा पसरली जाते. ही केवळ रेल्वे रूळावरील प्रदूषणाशी मयार्दीत नाही. पावसाळ्यात हे पाणी वाहत जाऊन विहीर, भुजल स्त्रोतात मिसळते. त्यामुळे जलप्रदुषण आणि वायु प्रदूषणात भर पडते. रेल्वे मार्गाच्या जवळ राहणार्या नागरिकांना नेहमीच दुर्गंधी सहन करावी लागते. या सर्व परिस्थितीचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. प्रदुषणाबाबत व्यापक सर्वेक्षण करून ते थांबविण्यासाठी कृती आराखडा सादर करावा. पर्यावरण पुरक बायोटॉयलेट्स कंपन्यानाच रेल्वे वॅगन्स तयार करण्याचे कत्राट द्यावे अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ----------