उत्तराखंडमध्ये ईव्हीएम मशिन्स जप्त करण्याचे आदेश
By admin | Published: April 27, 2017 03:21 PM2017-04-27T15:21:20+5:302017-04-27T16:38:09+5:30
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) जप्त करुन न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नैनिताल, दि. 27 - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) जप्त करुन न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या नेत्यांने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने या निवडणुकीत वापरण्यात आलेली ईव्हीएम जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच, उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि विकासनगरचे भाजपाचे आमदार मुन्ना सिंह चौहान यांना नोटीस पाठविली असून त्यांना सहा आठवड्यात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. याचबरोबर कोणत्याही निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर करण्यास नकार दिला आहे.
उत्तरराखंड विधानसभा निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीला मतदान झाले होते. तर 11 मार्चला निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीत राजधानी डेहराडूनमधील विकासनगर मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सहा हजार मतांनी पराभव झाला होता. यामुळे उमेदवारांने ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप करत नैनिताल येथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती.