बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश

By admin | Published: November 26, 2014 02:36 AM2014-11-26T02:36:36+5:302014-11-26T02:36:36+5:30

छत्तीसगड उच्च न्यायालयाने नसबंदी प्रकरणातील बंदी घातलेल्या व निकृष्ट दर्जाच्या औषधांना जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

Order for seizing prohibited drugs | बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश

बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश

Next
विलासपूर : छत्तीसगड उच्च न्यायालयाने नसबंदी प्रकरणातील बंदी घातलेल्या व निकृष्ट दर्जाच्या औषधांना जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यात नसबंदीच्या शक्रियेत वापरलेले सिप्रोसिन-5क्क् हेही औषध समाविष्ट आहे.
नसबंदी शक्रियांदरम्यान 13 महिलांचा मृत्यू झाला होता, तर अनेकींची प्रकृती गंभीर झाली होती. ही औषधे ज्यांनी घेतली आहेत त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे व त्यासाठी आरोग्य शिबिरे घेण्याविषयीही न्यायालयाने सांगितले आहे. 
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. टी.पी.शर्मा व न्या. इंदरसिंग उपवेजा यांनी हे आदेश दिले. काँग्रेस नेते मणिशंकर पांडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे. (वृत्तसंस्था)
 
 

 

Web Title: Order for seizing prohibited drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.