ममदापूर साठवण तलाव योजनेचे काम सुरु करण्याचे आदेश
By admin | Published: October 8, 2016 12:42 AM2016-10-08T00:42:19+5:302016-10-08T00:42:19+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ७४ कोटी रुपये दूध दर फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी पत्रकातून दिली. गतवर्षीच्या तुलनेत फरक रक्कम १९ कोटींची वाढ झाली असून, आजपर्यंतचा हा उच्चांकी दर फरक आहे. दूध संस्थांच्या दहा हजार कर्मचाऱ्यांचीही दिवाळी अधिक गोड होणार असून, त्यांच्यासाठी १४ कोटी ३७ लाख रुपये फरक मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दूध संघास १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत दूध पुरवठा झालेल्या म्हैस दुधास प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे, तर गाय दुधास १ रुपये २५ पैसे याप्रमाणे अंतिम दूध दर फरक दिला आहे. दर फरकातून प्रतिलिटर २० पैसे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स ठेवीपोटी जमा करण्यात आले आहे.
त्यामुळे डिबेंचर्स ठेववगळता म्हैस दुधास २ रुपये ५ पैसे, तर गायीसाठी १ रुपये ५ पैसे फरक उत्पादकांना मिळणार आहे. डिबेंचर्सवरील ९ टक्के दराने ३ कोटी ६५ लाख व शेअर भांडवलावर ११ टक्के दराने लाभांश ४ कोटी ३२ लाख असे ७३ कोटी ८१ लाख २ हजार ४७८ रुपये देणार आहे. ही रक्कम १४ आॅक्टोबरला दूध संस्थांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.