बंडखोर उमेदवारांना रोखण्याचे आदेश
By admin | Published: September 30, 2014 02:31 AM2014-09-30T02:31:44+5:302014-09-30T02:31:44+5:30
कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Next
>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भाजपा उमेदवाराला बेजार करू शकणा:या 29 बंडोबांची नावे दिल्लीतून निवडण्यात आली असून, कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बंडोबांना तात्काळ माघार घेण्याची विनंती करा, त्यासाठी त्यांना पाहिजे ती आश्वासने द्या, त्यांच्याच कलाने जा असे धोरण पक्षाने अवलंबिले आहे.
या तीन नेत्यांशिवाय पंकजा मुंडे, खा. सुनील गायकवाड व विनोद तावडे यांना बाजुला ठेवून त्याजागी आशीष शेलार यांनी अवघड जागेचे दुखणो दूर करण्यासाठी पक्षाने नेमले आहे. बंडखोरांमध्ये चार जण रिपाइंशी संबंधित आहेत. शिवसेनेच्या आव्हानामुळे आता भाजपाने आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही,असे ठरवून निवडणुकीत तापदायक ठरणा:या सा:याच घटकांना शांत करण्याची योजना आखली आहे. अनेक वर्षे स्वत:जवळील पैसा खचरून पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, आणि उमेदवारी मात्र ऐनवेळी पक्षात शिरलेल्या व्यक्तीला दिल्याने कमालीची खदखद उसळली आहे.
यांच्यावर आहे नजर
रामदास पाटील (चाळीसगाव), नरहरी गवई (मेहकर), डॉ. अविनाश चौधरी (अमरावती), राणा राननवरे, श्याम गायकवाड, सुनीता हिताते(वर्धा), श्याम दुरवे (तुमसर), बाबसाहेब गडपडवी(यवतमाळ), दत्ता श्रीराम (आर्णी), विठ्ठल रबदादे (गंगाखेड), माजी खासदार प्रताप सोनवणो (नाशिक प.),डॉ. हिरवे (भिवंडी), चिंतन जोशी (कल्याण प.), वानखडे (अंबरनाथ), मारूती भोईर (बेलापूर), अनिल ठाकूर , शशिबाला टाकसाळ, अनिल चव्हाण (चेंबूर), संजय दास्ताने (वडाऴा),नामदेऴ ताकवाणो (दौंड), हेमा भिगडे, अमर साबळे,राजेश पिल्लई (पिंपरी), माऊली जाधव (भोसरी),बळवंत जाधव (लातूर शहर), मदन गायकवाड (उद्गीर), राजकुमार पाटील (माढा), राजाराम गरूड (पलूस केडेगाव) बंडोबांची नावे लिहिली आहेत.