"रस्त्याच्या मधोमध गो तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश..."; कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:29 IST2025-02-04T16:08:44+5:302025-02-04T16:29:30+5:30
कर्नाटक सरकार गायींच्या तस्करीविरोधात अॅक्शनमोडमध्ये आले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात गायी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

"रस्त्याच्या मधोमध गो तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश..."; कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिला
देशात काही ठिकाणी गायींच्या तस्करी सुरू आहेत. कर्नाटकातही तस्करी वाढल्या आहेत, यावर आता कर्नाटक सरकार अॅक्शनमोडमध्ये आले आहे. तस्करांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घातल्या जातील, असं विधान एका कर्नाटक मंत्र्याने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा
गायी तस्करांना कर्नाटकचे मंत्री मंकल एस वैद्य यांनी इशारा दिला आहे. गायी तस्करांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घातल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यात तस्करी चालू देणार नाहीत, असे मंत्र्यांनी सांगितले. प्रशासन गायी आणि त्या पाळणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असं आश्वासनही त्यांनी दिली. येथील होन्नावरजवळ काही दिवसापूर्वी एका गायीची हत्या झाली. या प्रकरणी झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हे विधान केले.
मंत्री वैद्य म्हणाले, गायींची तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी एसपींना सांगितले आहे की, हे थांबले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत असे होता कामा नये. आपण गायींची पूजा करतो. आम्ही या प्राण्याला प्रेमाने वाढवतो. आपण त्याचे दूध पिऊन मोठे झालो आहोत.
कडक कारवाई केली जाणार
माध्यमांसोबत बोलताना मंत्री वैद्य म्हणाले की, त्यांनी पोलिसांना यामागील कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या गोष्टी सुरू राहिल्या तर आरोपींना रस्त्यावर गोळ्या घालून ठार मारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.