लाच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात गदारोळ, सरन्यायाधीशांनी बदलला दोन न्यायाधीशांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:01 AM2017-11-11T05:01:04+5:302017-11-11T05:01:24+5:30

सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अनुकूल आदेश मिळविण्यासाठी ओडिसा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाने लाच घेतल्याच्या आरोपाची पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाने तातडीने सुनावणी

The order of two judges has been changed in the Supreme Court on the matter of bribery, the Chief Justice has changed | लाच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात गदारोळ, सरन्यायाधीशांनी बदलला दोन न्यायाधीशांचा आदेश

लाच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात गदारोळ, सरन्यायाधीशांनी बदलला दोन न्यायाधीशांचा आदेश

Next

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडून अनुकूल आदेश मिळविण्यासाठी ओडिसा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाने लाच घेतल्याच्या आरोपाची पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाने तातडीने सुनावणी करण्याचे दोन न्यायमूर्तीच्या पीठाने गुरुवारी दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने शुक्रवारी रद्द ठरवले.
या प्रकरणात सरन्यायाधीशांचे नाव असल्याने ते वगळून पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे त्याची सुनावणी व्हावी, असे न्या. चेल्लमेश्वर व न्या. अब्दुल नझीर यांनी म्हटले होते. पण पीठावर कोण असावेत, हा पूर्णत: सरन्यायाधीशांचा निर्णय असल्याने गुरुवारचा आदेश बदलण्याचा निर्णय सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. के. अग्रवाल, न्या. अजय खानविलकर, न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताभ रॉय यांच्या पीठाने घेतला. प्रकरणे कोणत्या पीठापुढे द्यायचे याचा विशेषाधिकार सरन्यायाधीशांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The order of two judges has been changed in the Supreme Court on the matter of bribery, the Chief Justice has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.