सीमावर्ती भागातील गावांना रिकामी करण्याचे आदेश
By Admin | Published: September 29, 2016 02:43 PM2016-09-29T14:43:06+5:302016-09-29T15:08:15+5:30
भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्येक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे दाबे दणाणले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29- भारतीय लष्कराने बुधवारी रात्री प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यादृष्टीनं भारतानं जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेजवळील गावांना रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांचे नुकसान झाल्यानं पाकिस्तान धास्तावले आहे.
भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानंतर पाकिस्तान सीमावर्ती भागात गोळीबार होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाबमधील 10 किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात सर्व गावांना तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डरवर पाकिस्तान आणि भारताच्या लष्कराकडून होणारी बीटिंग रिट्रीटनं रद्द करण्यात आलं आहे. पर्यटकांना वाघा बॉर्डर क्षेत्रात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पाकिस्तान या कारवाईविरोधात दगाफटका करण्याची शक्यता असल्यानं राजनाथ सिंहांनी हे सतर्कतेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत.त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा असे हल्ले केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारत असल्यानं अशी सूचना केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.