“देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली”; मोरबी दुर्घटनेवर कंपनीच्या मॅनेजरचं संतापजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:00 PM2022-11-02T13:00:36+5:302022-11-02T13:03:55+5:30

Morbi Bridge Collapse : पुलाच्या दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्टर ओरेवा कंपनीला देण्यात आलं होतं. पण आता या कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. 

oreva manager calls it will of god bridge cable rusted not repaired police submit paper in court | “देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली”; मोरबी दुर्घटनेवर कंपनीच्या मॅनेजरचं संतापजनक विधान

फोटो - आजतक

Next

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत १४१ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुलावरील ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या पुलाच्या दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्टर ओरेवा कंपनीला देण्यात आलं होतं. पण आता या कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. 

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी यासाठी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेखला (Deepak Parekh) अटक झाली. कोर्टासमोर त्याने आता एक अजब आणि संतापजनक विधान केलं आहे. "देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली" असं दीपक पारेख याने म्हटलं आहे. "कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते खालच्या स्तरावरील कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली पण अशी दुर्दैवी घटना घडली हीच देवाची इच्छा होती" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी

मोरबी पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले. भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. शहरातील चार कब्रस्तान आणि सातही स्मशानांत असंच चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांकडे सोपवले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गर्दी झाली होती. शहरातल्या 4 कब्रस्तानमध्ये कबर खोदण्यासाठी वेळ लागत आहे. 

4 कब्रस्तानात कबरी खोदण्यासाठी 150 जण 

7 स्मशानांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती. काही ठिकाणी चिता रचण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. शहरातल्या 4 कब्रस्तानात कबरी खोदण्यासाठी 150 जण आहेत. कबरी खोदण्याचं काम दिवसरात्र सुरूच होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका लहान मुलाचा बूट हा नदी किनारी पडलेला सापडला तर गर्भवती महिलेचा मृतदेह पाहून देखील अनेकांच्या अंगावर काटा आला. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: oreva manager calls it will of god bridge cable rusted not repaired police submit paper in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.