कामुर्लीत माजी विद्यार्थ्यांची संघटना

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:52+5:302014-12-20T22:27:52+5:30

कामुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.

The organization of the former students of Camurli | कामुर्लीत माजी विद्यार्थ्यांची संघटना

कामुर्लीत माजी विद्यार्थ्यांची संघटना

Next
मुर्ली : योग्य विचारसरणी नसेल तर गगनचुंबी इमारतीतील शाळाही अर्थहीन असल्याचे मत प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले.
कामुर्ली येथील पिपल्स हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यातील अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघटना अस्तित्वात आहे. त्याच पद्धतीने या संघटनेद्वारे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून, शरद गाड यांनी संघटना स्थापन्यामागील उद्देश स्पष्ट केला.
मेळाव्यास काशिनाथ पेडणेकर, महेंद्र नाईक, भिवा उम्रसकर, राजेश कापोलकर, जयेश नाईक, समीर नाईक, सुशांत नाईक, सुविधा पार्सेकर, मोहन पार्सेकर, आनंद भोसले, रमेश आमेलकर, प्रज्योत नाईक, चंद्रनाथ राऊळ, दशरथ हळर्णकर, राजेंद्र जोशी, प्रेमानंद गावकर, शुश्रृत वळवईकर, सुषमा राणे, दिपीका साळगावकर, प्रकाश नाईक, विशांत गावकर, कृष्णा नाईक, शाम कोरगावकर, शिवा वळवईकर, दशरथ सावंत, अनिल साळगावकर, विवेक नाईक, अनिल, वैष्णवी च्यारी वगैरे माजी विद्यार्थी, त्यचबरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन च्यारी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)

Web Title: The organization of the former students of Camurli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.