काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

By admin | Published: January 19, 2016 03:01 AM2016-01-19T03:01:28+5:302016-01-19T03:01:28+5:30

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल होऊ घातले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या रचनेत स्थान दिल्या जाणाऱ्यांची यादीही तयार केली असून

Organization shuffle soon in Congress | काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

Next

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल होऊ घातले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या रचनेत स्थान दिल्या जाणाऱ्यांची यादीही तयार केली असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षनेतृत्वाने यावेळी संधीसाधूंना बाजूला सारण्याची तयारी केली आहे. संधी मिळताच दुसऱ्या पक्षात गेलेल्या मात्र आता स्वगृही परतू इच्छिणाऱ्यांना संघटनात्मक पदे देण्याचे टाळले जाईल. पक्षांतर्गत राजकारण किंवा अन्याय झाल्याच्या भावनेतून पक्ष सोडणाऱ्यांबाबत मात्र धोरण मवाळ राहणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांच्या मुद्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने सल्लामसलत चालविली आहे. राहुल गांधी लवकरच विविध राज्यांमधील प्रदेश नेत्यांना बोलावून युतीबाबत चर्चा सुरू करतील. उत्तर प्रदेशात मायावती आणि मुलायमसिंह यांच्याशी दोन हात करू शकणाऱ्या पक्षांचा काँग्रेसला शोध असेल. काँग्रेसला मुलायमसिंह यांच्याशी युती करायची नाही तरे बसपाला काँग्रेसची साथ नको आहे, पण कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही, असे सूत्रांनी नमूद केले.
डाव्यांकडून सकारात्मक संकेत...
प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी डाव्यांनी काँग्रेसशी युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असल्याचे कळते. मात्र या राज्यात डाव्यांसोबत युती तर केरळमध्ये काट्याची लढाई असे विरोधाभासी चित्र उभे ठाकू शकते. यावर तोडगा काढण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Organization shuffle soon in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.