भाजपमध्ये संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 05:51 AM2023-06-08T05:51:26+5:302023-06-08T05:52:13+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर नजर, बैठकांचे सत्र सुरू

organizational and cabinet reshuffle moves in bjp | भाजपमध्ये संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली

भाजपमध्ये संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली

googlenewsNext

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदा देशात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि मे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी भाजपच्या शीर्ष नेतृत्वामध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हे यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि राज्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठका घेत आहेत.

अंतर्गत सर्वेक्षणात यंत्रणेतील कमकुवतपणा समोर आल्यानंतर नेतृत्वाला किमान सहा राज्यांत विद्यमान संघटनेत बदल करावे लागणार आहेत. या प्रक्रियेत पक्ष बळकट करण्यासाठी काही केंद्रीय मंत्र्यांना पक्षात पाठवले जाऊ शकते. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने याबाबत व्यापक चर्चा होत आहे. नड्डा काही राज्यांतील नेत्यांशी चर्चा करीत आहेत आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करीत आहेत. शाह, नड्डा, संतोष हे तिघेही एकदा का निष्कर्षापर्यंत पोहोचले की मग त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे.

या ठिकाणी चिंता

छत्तीसगढमध्ये भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी विजयी रणनीती शोधावी लागेल. कारण, तेथे प्रदेश संघटन डबघाईला आले आहे. मध्य प्रदेशबाबत खरे तर हायकमांड चिंतेत आहे. परंतु, शिवराजसिंह चौहान यांच्याशिवाय दुसरा नेता सापडत नाही.

कुठे, कशी स्थिती? 

- राजस्थानमधील दिग्गज नेत्या वसुंधराराजे शिंदे यांना पक्षरचनेत सामावून घेतले जात असल्यामुळे भाजपला तेथे जिंकण्याची चिंता नाही. तेलंगणात प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी वाढत आहे. हायकमांड याबाबत चर्चा करीत आहे. 

- एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मित्र पक्षांबरोबर पंतप्रधानांनी भाजप नेतृत्वाला चर्चा करण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाऊ शकेल.
 

Web Title: organizational and cabinet reshuffle moves in bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.