संघटनात्मक रचना काँग्रेसचे संघटन

By Admin | Published: September 29, 2014 07:04 AM2014-09-29T07:04:04+5:302014-09-29T07:04:04+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संघटनेत एक खजिनदार, राजकीय सचिव, १२ सरचिटणीस, ४१ चिटणीस, १३ पक्ष प्रवक्ते यांचा संघटनेत समावेश आहे़

Organizational structure Congress organization | संघटनात्मक रचना काँग्रेसचे संघटन

संघटनात्मक रचना काँग्रेसचे संघटन

googlenewsNext

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संघटनेत एक खजिनदार, राजकीय सचिव, १२ सरचिटणीस, ४१ चिटणीस, १३ पक्ष प्रवक्ते यांचा संघटनेत समावेश आहे़
राष्ट्रीय अध्यक्ष
लोकशाही पद्धतीने संघटनात्मक पातळीवर दरवर्षी अध्यक्षपदाची निवड होते़ काँग्रेस कार्यकारिणी ही निवड करते़
कार्यकारिणी
काँग्रेस कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसमवेत सदस्य, कायम निमंत्रित सदस्य आणि निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे़
अखिल भारतीय काँगे्रस कमिटी
प्रदेश कार्यकारिणीने निवडून दिलेल्या ३५० सदस्यांचा अखिल भारतीय काँगे्रस कमिटीत समावेश आहे़ ही समिती संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची आहे़

प्रदेश काँग्रेस कमिटी
प्रत्येक राज्यात काँग्रेसची ही प्रदेश पातळीवरील शाखा आहे़ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड प्रदेश कार्यकारिणीतून होते़
जिल्हा/तालुका /ब्लॉक काँग्रेस कमिटी
राष्ट्रीय पातळीवरील पक्षरचनेनुसारच जिल्हा, तालुका, ब्लॉक पातळीवर संघटनेची बांधणी आहे़ प्रत्येक शाखेच्या अध्यक्षाची पक्ष पातळीवरील निवडणुकीतून बहुमताने निवड होते़
विविध समित्या
शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या या पक्षात विविध समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत.यामध्ये शिस्तभंग कारवाई समिती, प्रसिद्धी व प्रकाशन समिती, जाहीरनामा समिती, भविष्यातील आव्हानांचा वेध घेणारी समिती, निवडणूक समन्वय समिती, निवडणूकपूर्व आघाडी समिती आदींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे़
राज्यातील संघटन
माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत १०३ जणांचा समावेश आहे़ यामध्ये ९ उपाध्यक्ष, १ खजिनदार, १ सहखजिनदार, २६ सरचिटणीस, ५२ चिटणीस, ९ प्रवक्ते आहेत.

Web Title: Organizational structure Congress organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.