प्रजासत्ताकदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
By admin | Published: January 26, 2017 02:07 AM2017-01-26T02:07:39+5:302017-01-26T02:07:39+5:30
जळगाव- ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद वरिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, भाऊसाहेब काशिाथ लाठी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ रोजी सकाळी ७.३० वाजता ६८ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंदभाऊ लाठी यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. तसेच एन.सी.सी., आर.एस.पी. स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकांची मानवंदना व संचलन होईल. याप्रसंगी विविध हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच विविध देशभक्तीपर गीते देखील सादर होणार आहेत. विद्यार्थी व पालकांना उपस्थितीचे आवाहन मुख्याध्यापक व प्र.प्राचार्य यांनी केले आहे.
Next
ज गाव- ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद वरिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब रूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, भाऊसाहेब काशिाथ लाठी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ रोजी सकाळी ७.३० वाजता ६८ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंदभाऊ लाठी यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन होईल. तसेच एन.सी.सी., आर.एस.पी. स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकांची मानवंदना व संचलन होईल. याप्रसंगी विविध हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच विविध देशभक्तीपर गीते देखील सादर होणार आहेत. विद्यार्थी व पालकांना उपस्थितीचे आवाहन मुख्याध्यापक व प्र.प्राचार्य यांनी केले आहे.नूतन मराठा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजराजळगाव- नूतन मराठा महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख होते. सर्वप्रथम देशमुख सरांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्त्व काय असते याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.डी.पी.भारुडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य एस.डी.पाटील, आर.बी.देशमुख, डी.पी.पवार, एस.डी.सुर्वे, सर्व ज्युनिअर व सिनिअर प्राध्यापक उपस्थित होते,विद्यापीठस्तरीय टॅलेंट-२०१७ स्पर्धेचे आयोजनजळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च संस्थेतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट २०१७ स्पर्धेचे आयोजन शनिवार दि.२८ रोजी करण्यात आले आहे. यात प्रश्नमंजुषा व भित्ती पत्रिका सादर करण्यात येतील. स्पर्धेत प्रश्न मंजुषा ही सामान्यज्ञानवर आधारित राहील. तर भित्ती पत्रिकेसाठी डिमाँनेटनाीझेशन, सोलर एनर्जी, न्यँच्युरल एनर्जी रिसोर्सेस व कँशलेस इकॉनामी असे समाजातील ज्वलंत विषय सादर करण्यास देण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक १५०० रुपये तर भित्ती पत्रिकेसाठी ७०१ रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेच्या दिवशी सुद्धा नोंदणी करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक प्रा.धनपाल वाघुळदे यांनी केले आहे.