महिला बालकल्याण समितीतर्फे महिला महोत्सवाचे आयोजन
By admin | Published: February 8, 2015 12:19 AM2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30
समिती सभा : पालिका प्रशासनाने समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
Next
स िती सभा : पालिका प्रशासनाने समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपनाशिक : महिलांच्या अंगभूत कलांना वाव मिळावा यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त २ ते ८ मार्चदरम्यान महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आज महिला बालकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. महिलादिनानिमित्त दि. २ मार्चपासून हे कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सभेत सादर करण्यात आला. त्यात २ मार्च रोजी उद्घाटन झाल्यानंतर सर्व विभागीय कार्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, ३ मार्च रोजी पुष्परचना स्पर्धा, ४ मार्च रोजी वेशभूषा स्पर्धा, ५ मार्च रोजी पाककला स्पर्धा, ६ मार्च रोजी फॅशन शो आणि ७ मार्च रोजी मेहेंदी व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात येईल. याशिवाय २ ते ७ मार्चदरम्यान महिलांविषयक विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या व्य्याख्यानात कायदा, वैद्यकीय, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग आणि साहित्य या विषयावरील तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. याशिवाय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनाचाही प्रस्ताव त्यात ठेवण्यात आला असून, यासाठी एकत्रित ५८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यात म्हटले आहे. या बैठकीला सभापती रंजना बोराडे, ललिता भालेराव, सुमन ओहोळ, वैशाली दाणी, मनीषा हेकरे आदि उपस्थित होते. महिला बालकल्याणची चेेन्नई एक्स्प्रेसमहिला बालकल्याण समितीच्या अभ्यास दौर्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यात पुण्याऐवजी समितीचा दौरा चेन्नई येथे आयोजित करण्यावरही सदस्यांची संमती घेण्यात आली. याआधी पुणे आणि बंगळुरू येथे आयोजित केलेल्या दौर्यावर फेरविचार करून हा दौरा आता चेन्नई येथे नेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. हे दोन्ही प्रस्ताव मान्यतेसाठी येत्या सभेवर ठेवण्यात येणार आहेत. महिला सदस्यांची नाराजीमहिला बालकल्याण समितीच्या सभेला प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे. या समितीसाठी प्रकल्प अधिकारी नाही, कार्यालयात महापुरुषांच्या तसबिरी नाहीत. याशिवाय अंगणवाडीतील मुलांच्या समस्याही गंभीर असून, त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महिला सदस्यांनी केली. मुख्यसेविका भरतीला मंजुरीपालिकेच्या अंगणवाड्यांसाठी सहा मुख्यसेविका भरतीला परवानगी मिळाल्याने बर्याच काळापासून रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे.