डाळींब परिसंवादाचे आयोजन
By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:15+5:302016-04-15T23:32:05+5:30
देवळा : अखिल भारतीय डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन यांच्या सहकार्याने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत जळगाव येथे डाळींब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाळींब संघाचे संचालक जगदीश पवार यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कृषी मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.

गळतीमुळे पाण्याचा अपव्यय
येवला : येवला शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गळती थांबविण्याची गरज आहे. पाणीपुरवठा होणार्या कालावधीत पाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपालिकेने पाणी पुरवठा होणार्या काळात फिरते पथक नियुक्त करावे. दरम्यान पाणी वाया घालणार्यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवळ्यात सोमवारी संगीत रजनी
देवळा : देवळा शहरात महापुरूषाच्या जयंती उत्सवानिमित्त सोमवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.