सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा मुशायरा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:28+5:302016-02-20T02:01:28+5:30
अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मनिरपेक्ष विचाराचे स्मरण करीत देशभरातून आलेल्या शायरांनी आपल्या उर्दू काव्यरचना सादर करीत शिवरायांना शुक्रवारी रात्री अकोल्यात अनोखे अभिवादन केले.
Next
अ ोला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मनिरपेक्ष विचाराचे स्मरण करीत देशभरातून आलेल्या शायरांनी आपल्या उर्दू काव्यरचना सादर करीत शिवरायांना शुक्रवारी रात्री अकोल्यात अनोखे अभिवादन केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात ऑल इंडिया उर्दू मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण होते. प्रमुख अतिथी म्हणून भारिपचे गटनेते गजानन गवई, राष्ट्रवादीचे गटनेते राजकुमार मूलचंदानी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना साजिदखान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळे एकत्रित करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आज माणसा-माणसात अंतर निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. धर्मनिरपेक्षतेचे खरे उद्गाते शिवराय होते. त्यांना एखाद्या युद्धामध्ये कुराणाची प्रत सापडली तर ते सैनिकांना म्हणायचे वाटेत मशिदीत अत्यंत श्रद्धापूर्वक हे अस्मानी पुस्तक इमामाकडे द्या. दुभंगलेली मने साधण्यासाठी पुनश्च शिवरायांच्या सर्वसमावेशक विचारांची गरज असल्याचे पठाण यांनी सांगितले. मुशायरात जागतिक कीर्तीचे शायर मन्नान फराद (जबलपूर), हामीद भुसावली, अफजाल दानिश (बुरहानपूर), अजीमशाद रायपुरी, नईम फराद (अकोला), फारुख जमन या शायरांनी जीवनाभवाच्या व सामाजिक सलोख्याच्या कसदार रचना सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. मुशायराचे बहारदार उर्दू-मराठी सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही यांनी केले.आरंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्सव समितीच्या वतीने नागेश जाधव, योगेश सुर्वे, संयज सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, योगेश थोरात, सुभाष म्हैसने, सागर जाधव, गोपीअण्णा चाकर, सुधीर काहकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तब्बल चार तास चाललेल्या विविध आशयाच्या आशयगर्भ काव्यरचना शायरांनी सादर करून अकोलेकरांना अनोखी मेजवानी दिली. (प्रतिनिधी)