शहामृग २५ हजार वर्षांपूर्वी आले होते भारतात
By Admin | Published: March 11, 2017 12:16 AM2017-03-11T00:16:56+5:302017-03-11T00:16:56+5:30
मूळचे आफ्रि केत राहणारे शहामृग हे पक्षी २५ हजार वर्षांपूर्वी भारतात आले होते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. भूवैज्ञानिक आणि पुरातत्व अभ्यासकांना
हैदराबाद : मूळचे आफ्रि केत राहणारे शहामृग हे पक्षी २५ हजार वर्षांपूर्वी भारतात आले होते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. भूवैज्ञानिक आणि पुरातत्व अभ्यासकांना राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये शहामृगाच्या अंड्याच्या कवचाचे तुकडे मिळाले आहेत. येथील जीवविज्ञान केंद्रात अलिकडेच या कवचाची डीएनए चाचणी करण्यात आली. सेंटर आॅफ सेल्युलर अँड मोलेक्यूलर बायोलॉजीचे (सीसीएमबी) वरिष्ठ वैज्ञानिक कुमारसामी थंगाराज यांनी सांगितले की, आम्ही प्राचीन डीएनए सुविधा केंद्रात शहामृगाच्या अंड्याच्या कवचाचे यशस्वी विश्लेषण केले आहे आणि असे दिसून आले आहे की, अंड्याचे हे कवच अनुवंशिक स्वरुपात आफ्रिकी शहामृगासारखे आहेत. ते किमान २५ हजार वर्षांपूर्वीचे आहेत.
शोधपत्रिका प्लोस वनच्या ९ मार्च २०१७ च्या अंकात याबाबतचा लेख प्रकाशित झाला आहे.