...अन्यथा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याची गरज नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:10 AM2017-10-26T10:10:25+5:302017-10-26T10:12:18+5:30

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. टिकेचे धनी झालेले सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी दुसरे पर्याय शोधत आहे.

... otherwise do not need to link mobile number to adhar ? | ...अन्यथा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याची गरज नाही ?

...अन्यथा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याची गरज नाही ?

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकार इतर ओळखपत्रांच्या सहाय्याने वेरिफिकेशन प्रोसेस पुर्ण करण्याचा विचार करत आहेयामध्ये रेशन कार्ड, लायसन्स आणि पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहेपण अद्याप याप्रकरणी अंतिम निर्णय झालेला नाही

नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. टिकेचे धनी झालेले सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी दुसरे पर्याय शोधत आहे. गोपनीयतेच्या अधिकाराअंतर्गत लोक सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार इतर ओळखपत्रांच्या सहाय्याने वेरिफिकेशन प्रोसेस पुर्ण करण्याचा विचार करत आहे. यामध्ये रेशन कार्ड, लायसन्स आणि पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिका-याने माहिती दिली आहे की, 'आम्ही इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी तयार आहोत. रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येईल का यासंबंधी आम्ही विचार करत आहोत. पण अजून याप्रकरणी अंतिम निर्णय झालेला नाही. यासोबत आमचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणारा असला पाहिजे. आम्ही प्रक्रियेसोबत छेडछाड करु शकत नाही'. 

दूरसंचार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश दिला आहे. दूरसंचार विभागाने 23 मार्च रोजी मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं आहे. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल. जर तुम्हीदेखील अद्याप लिंक केलं नसेल, तर तात्काळ करुन घ्या, अन्यथा 28 फेब्रुवारी 2018 नंतर मोबाइल क्रमांक बंद करण्यात येईल. दुसरीकडे बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना, वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे. 

'काय हवं ते करा, पण आधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही' - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 

Web Title: ... otherwise do not need to link mobile number to adhar ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.