...अन्यथा शाहीन बागेतील आंदोलकांवर होणार गुन्हे दाखल; होऊ शकतो 2 वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:21 AM2020-03-17T10:21:10+5:302020-03-17T10:21:42+5:30

सध्या सरकारच्या अधिनियमातून लग्न समारंभ वगळण्यात आले आहे. मात्र जीम, नाईटक्लब, स्पा, साप्ताहिक बाजार 31 मार्चपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असंही केजरीवाल म्हणाले.

... otherwise, the protesters in Shaheen Gardens will be charged with crimes; Can be imprisoned for up to 2 years | ...अन्यथा शाहीन बागेतील आंदोलकांवर होणार गुन्हे दाखल; होऊ शकतो 2 वर्षे कारावास

...अन्यथा शाहीन बागेतील आंदोलकांवर होणार गुन्हे दाखल; होऊ शकतो 2 वर्षे कारावास

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने लग्न समारंभांसह एकावेळी 50 लोक एकत्र जमण्यावर देखील 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे. या कालावधीत जीम, नाईटक्लब, थिएटर, स्पा सेंटर आणि साप्ताहिक बाजार बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध महामारी अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास आणि दंड होऊ शकतो. हा नियम शाहीन बागेतील आंदोलकांवर देखील लागू होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या उच्च स्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले की, सामाजिक, धार्मिक, संस्कृतीक आणि राजकीयसह आंदोलनासाठी 50 हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. याआधी ही संख्या 200 होती. 

सध्या सरकारच्या अधिनियमातून लग्न समारंभ वगळण्यात आले आहे. मात्र जीम, नाईटक्लब, स्पा, साप्ताहिक बाजार 31 मार्चपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असंही केजरीवाल म्हणाले.

सीसीए विरुद्ध शाहीन बाग येथील आंदोलनासंदर्भात केजरीवाल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केजरीवाल म्हणाले की, 50 हून अधिक लोक जमणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी आहे. कोणी हे मान्य केल नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना व्हायरस रोखण्यास दिल्ली सरकार प्राधान्य देत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: ... otherwise, the protesters in Shaheen Gardens will be charged with crimes; Can be imprisoned for up to 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.