... अन्यथा भारताशी युद्धच - हाफिज सईद
By admin | Published: July 22, 2016 06:40 PM2016-07-22T18:40:11+5:302016-07-22T18:40:11+5:30
कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने गरळ ओकली
ऑनलाइन लोकमत
गुंजरावाला, दि. २२ : कश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल अशी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने गरळ ओकली आहे. पाकिस्तानमध्ये उघडपणे दहशतवाही कारवाया होत आहेत हे यावरुन सिद्ध होतं. तो गुंजरावालात 'कश्मीर कांरवां' दरम्यान बोलत होता. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीने काही दिवसापुर्वी मला फोन केला होता. तो म्हणाला 'माझी तुम्हाला बोलण्याची शेवटची इच्छा आहे. माझी शेवटची इच्छा पुर्ण जाली आहे. मी शहीद होण्यासाठी तयार आहे.'
हाफिज सईद पुढे बोलताना म्हणाला, माझी बहीन आशिया अंद्राबी फोन वर १५ मि. रडत होती. मी तिला समजवतना म्हणालो, तू रडू नको आपण आपल्या योग्य मार्गावर आहे. आपल्याला यश मिळेल.
हिजबुल मुजाहिदीनच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारून भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप रविवारी पाकिस्तानने केला. काश्मीर प्रश्न केवळ तेथील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असल्याचे मान्य केले तरच सोडवला जाणे शक्य आहे, असेही पाकने म्हटले. निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या सततच्या हत्यांचा पाक कठोरपणे निषेध करतो. बुरहान वनी व असंख्य निष्पाप काश्मिरींची हत्या ही खेदजनक व निषेधार्थ असून, त्यामुळे काश्मिरींच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होते. हत्यांमुळे जम्मू आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाला रोखता येणार नाही, असे त्यात म्हटले.