जनतेच्या ‘मन की बात’वर आमचा विश्वास-राहुल गांधी
By admin | Published: May 2, 2017 01:01 AM2017-05-02T01:01:55+5:302017-05-02T01:01:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना ‘मन की बात’ ऐकविण्यात धन्यता मानतात. आमचा
देदीयापाडा (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना ‘मन की बात’ ऐकविण्यात धन्यता मानतात. आमचा जनतेची ‘मन की बात’ ऐकण्यावर विश्वास आहे, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपरोधिक टोला हाणला.
आमचा पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक प्रारंभ करताना म्हणाले. नर्मदा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासींच्या रॅलीला ते संबोधित करीत होते. काँग्रेस पूर्ण शक्तिनिशी ही निवडणूक लढणार असून मोदींना त्यांच्याच राज्यात पराभूत करेल. गुजरातमध्ये निवडणुका होत असून काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास ते कोणत्याही एका व्यक्तीचे न राहता प्रत्येकाचे असेल. आम्ही आमची मन की बात सांगण्याऐवजी तुमची मन की बात ऐकून घेऊ, असे सांगत मोदींच्या रेडिओवरील कार्यक्रमावर उपरोधिक टीका केली.गुजरातमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून भाजप सत्तेवर असून या राज्याला पूर्णत: बदलण्यासाठी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)