आमचे मौलवी आम्हाला परत करा, भारताची पाकिस्तानला ताकीद
By admin | Published: March 17, 2017 12:14 PM2017-03-17T12:14:55+5:302017-03-17T12:16:59+5:30
भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातील दोन मौलवी पाकिस्तानध्ये जाऊन बेपत्ता झाल्याचं प्रकरण जोर धरु लागलं आहे. भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विट करत भारताने पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर पाऊल उलचण्याची विनंती केली आहे.
आसिफ निजामी आणि त्यांचा भाऊ नाजिम निजामी धार्मिक यात्रेसाठी पाकिस्तानला गेले होते. मात्र बुधवारी अचानक ते बेपत्ता झाले. इस्लामाबादमधील भारतीय राजदूताने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी तक्रारदेखील केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मौलवींचं इसीसने अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र यामागचं कारण कळू शकलेलं नाही. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत माहिती दिली आहे की, 'आम्ही ही मुद्दा पाकिस्तान सरकारसमोर उचलला आहे. आणि त्यांना भारतीय नागरिकांसंबंधी माहिती पुरवण्याचा आग्रह केला आहे'.
Indian nationals Syed Asif li Nizami aged 80 years and his nephew Nazim Ali Nizami had gone to Pakistan on 8 March 2017. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 17, 2017
दरम्यान बेपत्ता झालेल्या मौलवींमधील एक आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'आम्ही भारत सरकारडे दोन्ही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची विनंती केली आहे. एका पवित्र यात्रेसाठी ते पाकिस्तानला गेले होते, पण आता त्यांचा शोध लागत नाही आहे. त्यांना लवकरात लवकर परत आणावं अशी आमची विनंती आहे', असं आमीर निजामी बोलला आहे.
We have taken up this matter with Government of Pakistan and requested them for an update on both the Indian nationals in Pakistan./4
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 17, 2017