आमची संघटना म्हणजे पक्ष नव्हे : सिद्धू
By admin | Published: September 22, 2016 04:08 AM2016-09-22T04:08:43+5:302016-09-22T04:08:43+5:30
आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे
चंदीगड : आवाज-ए-पंजाब ही आमची राजकीय संघटना असून, पक्ष स्थापन करून निवडणुका लढविण्यासाठी आमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही या संघटनेतर्फे निवडणुका लढवणार नाही.
मात्र राज्यातील अकाली दल-भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीविरोधातील मतांची फाटाफूट होता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याने समविचारी पक्षांशी आम्ही समझोता करू, असे माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी स्पष्ट केले.
ते म्हणाले की सरकारविरोधी मते फुटू नयेत आणि मते फुटण्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला मिळू नये, असे आमचे प्रयत्न कायम राहतील आणि त्यासाठी अन्य पक्षांशी निवडणुकीचा समझोता करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ते
म्हणाले. (वृत्तसंस्था)
सिद्धू कोणाशी
समझोता करणार?
अकाली दल व काँग्रेस यांच्याविरोधात लढण्यास सिद्धू यांच्या संघटनेकडे आम आदमी पार्टी आणि ज्या पक्षातून ते बाहेर पडले, ती भाजपा यांच्यापैकी एकाशी निवडणूक समझोता करणे, एवढाच पर्याय सिद्धू यांच्यापुढे शिल्लक राहतो.