काळा पैशासंदर्भात आमचं धोरण स्पष्ट- व्यंकय्या नायडू
By admin | Published: November 9, 2016 06:57 PM2016-11-09T18:57:19+5:302016-11-09T18:57:19+5:30
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काळा पैशासंदर्भात आमचं धोरण स्पष्ट आहे, असं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काळा पैशासंदर्भात आमचं धोरण स्पष्ट आहे, असं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. काँग्रेससह विरोधकांकडून 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यावर झालेल्या टीकेला व्यंकय्या नायडूंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकारनं काळा पैशावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. काळा पैसा संपवण्यासह टॅक्स चोरीच्या प्रकारांना लगाम घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारनं सामाजिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानं भ्रष्टाचारासह महागाई कमी होण्यासाठी मदत होणार आहे. 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा गरिबांच्या फायद्यासाठी घेतल्याचंही व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे.
दरम्यान सरकार देशात कॅशलेस इकॉनॉमी आणू पाहत आहे. या निर्णयामुळे गरिबांचं हित साधलं जाणार आहे. काँग्रेस जाणूनबुजून या प्रकरणी राजकारण करत असल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.