आमची लढाई हायजॅक करण्याचा RSSचा प्रयत्न
By admin | Published: October 2, 2015 02:08 PM2015-10-02T14:08:17+5:302015-10-02T14:08:17+5:30
आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक आमचा मुद्दा हायजॅक करत असल्याची टीका पाटीदार अमानत आंदोलन समितीच्या हार्दिक पटेलने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक आमचा मुद्दा हायजॅक करत असल्याची टीका पाटीदार अमानत आंदोलन समितीच्या हार्दिक पटेलने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केली आहे. सरकारी नोक-या व शिक्षणसंस्थांमध्ये असलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती, जीवरून संघावर प्रचंड टीका झाली आणि भाजपाला ही पक्षाची भूमिका नसल्याचे वारंवार सांगावे लागले.
आपले आंदोलन दिल्लीसह उत्तर भारतात पसरवण्याचा विचार करणारा हार्दिक सध्या दिल्लीत आहे. ज्या ज्यावेळी संघ आरक्षण हटवण्याची मागणी करतं, त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं असंही हार्दिकने पुढे म्हटले आहे.
आम्ही हा विषय छेडला असून त्या लाटेवर RSS स्वार होण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही हार्दिकने केली आहे. वरच्या जातीचे लोक सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत, तर खालच्या जातीच्या लोकांना आरक्षण मिळतं आणि त्यांचा वापर मतपेट्यांसाठी होतो, परंतु उरलेल्या मधल्या लोकांना काय मिळतं असा सवाल करत हार्दिकने पटेल समाजासह गुज्जर, मराठा, कुर्मी आदी मोठ्या संख्येने असलेल्या लोकांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
हार्दिक पटेल दिल्लीमध्ये कार्यलय उघडत असून पुढील महिन्यात उत्तर भारतातील समर्थकांची प्रचंड रॅली आयोजित करण्याची त्याची योजना आहे. हार्दिक पटेलला दिल्लीत तसेच बिहारमध्ये किती प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.