आमची माती आमची माणसं सांगोला - अरुण बोत्रे

By admin | Published: April 11, 2015 01:40 AM2015-04-11T01:40:19+5:302015-04-11T01:40:19+5:30

सांगोला तालुका म्हटले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलेल्या डाळिंबाची आठवण सर्वांना लगेच होते. सांगोला तालुक्यातील कष्टकरी शेतकर्‍यांनी पीक पद्धती बदलून डाळिंब पिकाची लागवड केली. डाळिंबाचे भरघोस उत्पादन करून सांगोल्याचे नाव सातासमुद्रापार नेले. सध्या सांगोल्याची ओळख डाळिंबाने करून दिली जाते. 1985 ते 2015 पर्यंत सांगोला तालुका डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. डाळिंब पीक घेणार्‍या शेतकर्‍यांवर नैसर्गिक तेलकट डागाच्या डाळिंबाच्या पिकावर आक्रमण झाले; परंतु डाळिंब शेतकरी त्यातून धैर्याने सावरला. पुन्हा नव्याने तेलकट रोगावर मात करून ताठ मानेने उभारला आहे.

Our soil Our people are Sangola - Arun Bottre | आमची माती आमची माणसं सांगोला - अरुण बोत्रे

आमची माती आमची माणसं सांगोला - अरुण बोत्रे

Next
ंगोला तालुका म्हटले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलेल्या डाळिंबाची आठवण सर्वांना लगेच होते. सांगोला तालुक्यातील कष्टकरी शेतकर्‍यांनी पीक पद्धती बदलून डाळिंब पिकाची लागवड केली. डाळिंबाचे भरघोस उत्पादन करून सांगोल्याचे नाव सातासमुद्रापार नेले. सध्या सांगोल्याची ओळख डाळिंबाने करून दिली जाते. 1985 ते 2015 पर्यंत सांगोला तालुका डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. डाळिंब पीक घेणार्‍या शेतकर्‍यांवर नैसर्गिक तेलकट डागाच्या डाळिंबाच्या पिकावर आक्रमण झाले; परंतु डाळिंब शेतकरी त्यातून धैर्याने सावरला. पुन्हा नव्याने तेलकट रोगावर मात करून ताठ मानेने उभारला आहे.
सांगोला तालुक्याची ओळख ही दुष्काळी भाग म्हणून पूर्वीपासून आहे. सांगोला तालुक्याच्या राजकीय पटलावर प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाच्या आ. गणपतराव देशमुख यांच्या डाव्या विचारसरणीचा गेल्या 60 वर्षांपासून प्रभाव जाणवतो. 1952 ते 1962 पर्यंत 10 वर्षे सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून काँग्रेसचे कै. केशवराव राऊत (मेडशिंगी) यांनी काम पाहिले. सन 1962 मध्ये गणपतराव देशमुख पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी कोळे भागात बुद्धेहाळ येथे इंग्रजांनी बांधलेल्या तलावात त्या भागातील शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या होत्या, त्या शेतकर्‍यांच्या जमिनीला मोबदला मिळावा म्हणून गणपतराव देशमुख यांनी 1958 च्या दरम्यान लढा उभारला. शेतकर्‍यांची वकिली करून त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यात ते यशस्वी झाले.
सन 1972 व सन 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता आ. गणपतराव देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. एकाच पक्षातून, एकाच मतदारसंघातून 11 वेळा विधानसभा निवडणूक निवडून येण्याचा विक्रम आ. देशमुख यांच्या नावावर आहे. सांगोला शेतकरी सूत गिरणी (1985), शेतकरी महिला सूत गिरणी (2005) या दोन सूत गिरण्या सुरू करून सांगोला तालुक्यातील हजारो हातांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला आहे. क्रांतीअग्रणी कै. नागनाथअण्णा नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी संघर्ष चळवळीचा लढा उभा केला. या लढय़ाने टेंभू-म्हैसाळ प्रकल्पाचे कृष्णेचे पाणी सांगोला तालुक्यात येण्यात यश मिळाले आहे. हे पाणी कालवे खोदून शेतकर्‍यांच्या शेतात आणण्याचे त्यांचे ध्येय आहे. याकामी विधानपरिषदेचे आमदार दीपकराव साळुंखे-पाटील यांची मोठी साथ मिळत आहे. नीरा उजवा कालवा फाटा नं. 4 व सांगोला शाखा कालव्याचे पाणी आणण्याचे कामही दोन्ही लोकप्रतिनिधींनी मार्गावर आणले आहे.
सांगोला शहराचा पाणीपुरवठा तसेच सांगोला तालुक्यासाठी 88 गावांची शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवून सांगोला शहर आणि तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला आहे.
सन 1972 साली कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी आ. गणपतराव देशमुख यांचा पराभव केला. कै. साळुंखे-पाटील यांनी नीरा उजवा कालव्याचा फाटा मंजूर केला. 1958 साली त्यांनी विद्या विकास मंडळ जवळे या शिक्षक संस्थेची स्थापना केली. 1995 साली अँड. शहाजीबापू पाटील यांनी आ. गणपतराव देशमुख यांचा पाणीप्रश्नावर पराभव केला. त्यावेळी भाजप-सेना सरकारच्या काळात टेंभू-म्हैसाळ योजनेची सुरुवात कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत झाली. दीपकराव साळुंखे-पाटील यांनी सोलापूर स्थानिक स्वराज संस्था, विधानपरिषद निवडणुकीत विजयी होऊन सोलापूर जिल्?ात विकासकामाचा धडाका उडवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आ. साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुक्यात सहकार क्षेत्रात मोठे काम उभारले आहे. म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी पारे तलावात-कोरडा नदीत आणण्यामध्ये त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. आ. दीपकराव साळुंखे-पाटील यांच्या भगिनी जयमाला गायकवाड या सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून यशस्वीरित्या काम करीत आहेत.
सन 1987 नंतर सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून बोर-डाळिंबाची लागवड केली. हा बदल कमालीचा यशस्वी झाला व शेतकरी सध्या डाळिंब लागवडीसाठी प्रयत्नशील आहे. तालुक्यात 15000 हेक्टरपर्यंत क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे.
शेती क्षेत्रामध्ये मोठय़ा सुधारणा होत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. सन 1952 साली कै. बापूसाहेब झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थेचा विस्तार करून शिक्षणाची गुणवत्ता टिकविली आहे. 1958 मध्ये कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी जवळे येथे विद्या विकास मंडळ संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचे चिरंजीव आ. दीपकराव साळुंखे-पाटील यांनी या शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार करून तालुका व जिल्?ात शैक्षणिक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. कै. संभाजीराव शेंडे यांनी आपल्या सहकार्‍यांसह शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाची सोय केली. सन 1979 साली सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगोला महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊन ते सुरू झाले. त्यावेळी कै. बापूसाहेब झपके, कै. बजरंग लोखंडे, कै. संभाजीराव शेंडे यांचा पुढाकार होता. भविष्यात बाबुराव गायकवाड यांनी अध्यक्ष या नात्याने लक्ष घालून संगणक शिक्षणाची सोय केली. सांगोला महाविद्यालयाची भव्य इमारत उभी केली. त्याचप्रमाणे र्शी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना करून काळानुरूप शैक्षणिक अभ्यासक्रमांना चालना दिली. दिलीप इंगवले यांनी मेथवडे येथे डी-फार्मसी कॉलेज सुरू करून औषध निर्माणशास्त्र शिक्षणाची सोय केली. आ. गणपतराव देशमुख यांनी 1969 साली सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून सांगोला येथे माध्यमिक शिक्षणाची सोय केली. त्यानंतर विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली तसेच संगणक शिक्षणाची सोय केली.
सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील रहिवासी असलेले एम. एन. नवले यांनी पुणे येथे सिंहगड एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारल्या आहेत . एम. एन. नवले यांनी सांगोला कमलापूर येथे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एम. बी. ए., एम. सी. ए.- डी. एड., बी. एड., सिंहगड इंग्लिश मीडियम, आनंद विद्यालय अशा शैक्षणिक संस्था निर्माण करून ग्रामीण भागातील जनतेच्या दारात शैक्षणिक सुविधा दिल्या आहेत.
याचबरोबर सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील रुपनर बंधूंनी सांगोला शहराला लागून सर्वसोयींनीयुक्त फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच फॅबटेक स्पिनिंग मिल सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गारमेंट उद्योग सुरू करून महिलांच्या हातांना काम उपलब्ध करून दिले आहे. कार्यकारी संचालक भाऊसाहेब रुपनर हे बारकाईने लक्ष घालून सर्व संस्था यशस्वीरित्या हाताळत आहेत.
सांगोला शहरातील नगरवाचन मंदिरास 100 वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. र्शी गोंदवलेकर महाराज यांच्या भक्तगणांनी लोकवर्गणीतून वाढेगाव रोडवर सुंदर अशा ध्यानमंदिराची उभारणी केली आहे. अनेक साधक या ध्यानमंदिराचा लाभ घेतात. डॉ. संजीवनी केळकर या स्त्रियांच्या न्याय्य हक्कासाठी प्रथमपासून समाजकार्य करतात. त्यांनी स्थापन केलेल्या मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्रातून पीडित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. महिला बचत गट, महिला सहविचार सभा, उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, वाचनालय, तसेच इतर अनेक माध्यमातून डॉ. संजीवनी केळकर यांचे काम सुरू आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले हे सध्या सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे मराठी साहित्यात कथा, ललित लेख, इतर साहित्य मोठय़ा प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे.
सांगोला नगरपालिका ही ‘क’ वर्ग नगरपालिका सर्वात जुनी आहे. 10 जानेवारी 1855 साली सांगोला नगरपरिषदेची स्थापना झाली. 2005 साली नगरपरिषद स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाली. पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अँड. पृथ्वीराज चव्हाण यांनी सन 1974 ते 1979 पर्यंत लोकाभिमुख काम केले. 1927 साली मिरज-लातूर ही नॅरोगेज रेल्वे सांगोला येथे सुरू झाली. 2-3 वर्षांपूर्वी ब्रॉडगेज रेल्वेमार्ग सुरू झाला.
दृष्टिक्षेपात सांगोला तालुका
सांगोला तालुका लोकसंख्या
एकूण लोकसंख्या - 322845, पुरुष- 166754, महिला- 156091
सांगोला शहर -
एकूण - 34341, पुरुष- 17720, महिला- 16601
एकूण क्षेत्र हेक्टर
भौगोलिक क्षेत्र- 159737 हेक्टर, बागायती क्षेत्र- 23259 हेक्टर, जिरायती क्षेत्र- 110055 हेक्टर, पड क्षेत्र- 46486 हेक्टर.
एकूण ग्रामपंचायती - 76
महसुली गावे- 102, वाड्यावस्त्या- 621, एकूण सजे- 54, गावे- 103, मंडले - 9
एकूण जिल्हा परिषद गट - 6
1) महुद, 2) घेरडी, 3) वाढेगाव, 4) जवळा, 5) चोपडी, 6) कोळे.
एकूण पंचायत समिती गण - 12
1) महुद, 2) चिकमहुद, 3) एखतपूर, 4) वाढेगाव, 5) घेरडी, 6) कडलास, 7) वाटंबरे, 8) चोपडी, 9) कोळे, 10) हातीज, 11) सोनंद, 12) जवळा.
शैक्षणिक विभाग :-
जिल्हा परिषद शाळा - 408, खासगी शाळा अनुदानित - 62, खासगी शाळा विनाअनुदानित - 12, आर्शमशाळा अनुदानित - 6, आर्शमशाळा विनाअनुदानित- 11, कायम विनाअनुदानित शाळा - 16, वरिष्ठ महाविद्यालये - 4, ज्युनिअर कॉलेज - 22, अध्यापक विद्यालय- 5, जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी - 23305.
रास्त भाव दुकाने - 144, रेशन कार्ड संख्या - 67479
प्राथमिक आरोग्य केंद्रे - 6
1) अकोला, 2) नाझरे, 3) कोळे, 4) जवळा, 5) घेरडी, 6) महुद.
एकूण सहकारी संस्था - 448, विकास सेवा सोसायटी - 81
पशुवैद्यकीय दवाखाने -
र्शेणी - 1 = 15 दवाखाने / र्शेणी - 2 = 9 दवाखाने.
---------------------------------

Web Title: Our soil Our people are Sangola - Arun Bottre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.