३०५ पैकी ५३ कोटींचा खर्च ३२ टक्के खर्च : सलग आचारसंहितेमुळे जिल्‘ातील विकास कामे लांबणार

By Admin | Published: October 22, 2016 12:52 AM2016-10-22T00:52:27+5:302016-10-22T00:52:27+5:30

जळगाव : जिल्‘ात नगरपालिका निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभर आचारसंहिता लागू झाली आहे. यासार्‍यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ३०५ कोटी रुपयांपैकी केवळ ५३ कोटी रुपयांची कामे झाली आहे. सलग आचारसंहिता कायम राहिल्यास यावर्षात विकासकामांना फटका बसणार आहे.

Out of 305 out of 53 crores spent 32% expenditure: Due to continuous code of conduct, development works in district will be delayed | ३०५ पैकी ५३ कोटींचा खर्च ३२ टक्के खर्च : सलग आचारसंहितेमुळे जिल्‘ातील विकास कामे लांबणार

३०५ पैकी ५३ कोटींचा खर्च ३२ टक्के खर्च : सलग आचारसंहितेमुळे जिल्‘ातील विकास कामे लांबणार

googlenewsNext
गाव : जिल्‘ात नगरपालिका निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभर आचारसंहिता लागू झाली आहे. यासार्‍यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ३०५ कोटी रुपयांपैकी केवळ ५३ कोटी रुपयांची कामे झाली आहे. सलग आचारसंहिता कायम राहिल्यास यावर्षात विकासकामांना फटका बसणार आहे.
४५७ कोटींचे वार्षिक सर्वसाधारण नियोजन
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सन २०१६/१७ या आर्थिक वर्षात एकूण ४५७ कोटी ९६ लाख ६७ हजार रुपयांचे नियतव्य मंजूर झाले आहे. त्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३०५ कोटी ९९ लाख, आदिवासी उपयोजनासाठी (टीएसपी) २५ कोटी ३९ लाख, आदिवासी उपयोजना (बाह्यक्षेत्रासाठी) (ओटीएसपी) ४७ कोटी ४० लाख, तर अनुसूचित जाती उपयोजनासाठी (एससीपी) ७९ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती.
१६४ कोटी ३२ लाखांचा निधी वितरित
मंजूर निधीपैकी शासनाकडून ३९९ कोटी ९६ लाखांच्या निधीची तरतूद जिल्‘ासाठी प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाने संबंधित यंत्रणांना १६४ कोटी ३२ लाख ४१ हजारांचा निधी वितरीत केला आहे. मात्र त्यापैकी केवळ ५३ कोटी ३ लाखांचा निधी सप्टेंबर महिन्यापर्यंत खर्च झाला आहे.
जिल्‘ात सलग आचारसंहिताचा राहणार अंमल
जिल्‘ात नगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने काही प्रमाणात ढिल दिली. मात्र दुसर्‍याच दिवशी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्‘ात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांपाठोपाठ जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यानंतर पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या काळात जिल्‘ात कायम आचारसंहितेचा अंमल राहणार आहे.

वर्क ऑर्डरच्या कामांनाही फटका
आचारसंहिता सुरू झाल्यामुळे जे कामे सुरू आहेत, त्याच कामांना निधी मिळणार आहे. ज्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. ती कामे मात्र सुरू करता येणार नाही. त्यामुळे ही कामे सुरु करण्यासाठी आचारसंहिता शिथील होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. मात्र जिल्हा नियोजन विभागाकडून आमदार निधीची सर्व रक्कम वितरित करण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०१६/१७ सप्टेंबर अखेर झालेला खर्च

जिल्हा वार्षिक योजना वितरित निधी खर्च निधी
सर्वसाधारण ११३६७.४६ ३५०८.०८
एससीपी २१६३.३० २५.००
टीएसपी ८८९.२० ५०८.४०
ओटीएसपी २०१२.४५ १२६२.११
एकूण १६४३२.४१ ५३०३.५९
(सर्व रक्कम लाखात)

Web Title: Out of 305 out of 53 crores spent 32% expenditure: Due to continuous code of conduct, development works in district will be delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.