रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:25 PM2024-04-04T14:25:36+5:302024-04-04T14:26:19+5:30

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून, श्रीरामनवमी उत्सवाला ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

over 1 5 crore devotees took darshan of ram lalla in ram mandir ayodhya and likely 40 lakh to came for ram navami utsav 2024 | रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

रामललाचा त्रिवार जयजयकार! १.५ कोटी भाविकांनी घेतले दर्शन; रामनवमीला ४० लाख येणार?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले. रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आला. यानंतर भाविकांचा महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले. २२ जानेवारी रोजी राम मंदिर खुले झाल्यापासून आतापर्यंत तब्बल दीड कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर राम मंदिर बांधल्यानंतर प्रथमच साजऱ्या होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवासाठी तब्बल ४० लाख भाविक येऊ शकतात, असा दावा केला जात आहे. 

राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा श्रीराम नवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी, प्रशासन आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सज्ज झाले आहेत. यंदाच्या या रामनवमी उत्सवाला तब्बल ४० लाख भाविक येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्यासाठी २४ राम मंदिर खुले ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. 

तीन दिवस २४ तास मंदिर राहणार खुले

१५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत राम मंदिर २४ तास खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही वेळेस आले, तरी रामललाचे दर्शन सुलभपणे घेता येणार आहे. आवश्यकता भासल्यास १८ एप्रिल रोजीही राम मंदिर दिवसभर खुले ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अयोध्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने बैठका घेत असून, सर्व गोष्टींचा सविस्तर पद्धतीने आढावा घेत आहेत, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राम मंदिरात दररोज सुमारे २ लाखांच्या घरात भाविक दर्शनाला येतात. काहीवेळेस ही संख्या ४ ते ५ लाखांवर जाते. श्रीराम नवमीच्या दिवशी रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महासागर लोटू शकतो, यादृष्टीने सर्व गोष्टींची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत २४ तास मंदिर खुले ठेवल्याने अधिकाधिक भाविक रामललाचे दर्शन करू शकतील, असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 


 

Web Title: over 1 5 crore devotees took darshan of ram lalla in ram mandir ayodhya and likely 40 lakh to came for ram navami utsav 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.