कॅनडा की अमेरिका? सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कोणत्या देशात शिकत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:54 PM2024-08-03T20:54:24+5:302024-08-03T21:07:09+5:30

१३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले.

Over 13 lakh Indian students pursuing higher studies abroad in 2024: Government | कॅनडा की अमेरिका? सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कोणत्या देशात शिकत आहेत?

कॅनडा की अमेरिका? सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कोणत्या देशात शिकत आहेत?

नवी दिल्ली : परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. १३ लाखांहून अधिक भारतीयविद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवासी विद्यार्थ्यांची आकडेवारी सरकार ठेवते का, असा प्रश्न कीर्तीवर्धन सिंह यांना विचारण्यात आला होता. यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, रशिया, इस्रायल आणि युक्रेनसह १०८ देशांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे सविस्तर माहिती दिली.

दिलेल्या माहितीनुसार, सध्या १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३ मध्ये हा आकडा १३, १८, ९५५ होता, तर २०२२ मध्ये हा आकडा ९,०७,४०४  होता. कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, चालू वर्षात १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थ्यांपैकी कॅनडात ४,२७,०००, अमेरिकेत ३,३७,६३०, चीनमध्ये ८५८०,  ग्रीसमध्ये ८ ,  इस्रायलमध्ये ९००, पाकिस्तानात १४ आणि युक्रेनमध्ये २५१० विद्यार्थी   शिकत आहेत. 

दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, भारत सरकार व्हिसा फ्री एंट्री ट्रॅव्हल, व्हिसा ऑन अरायव्हल यासारख्या सुविधा देऊ शकतील अशा देशांची संख्या वाढवण्यासाठी भारतीयांना जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचबरोबर, परदेशात भारतीय मिशन/पोस्ट नियमितपणे परदेशात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात आणि त्यांना त्यांच्याकडे किंवा ग्लोबल रिश्ता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे कीर्तीवर्धन सिंह म्हणाले.

भारतीय मिशन/पोस्टद्वारे प्रथमच परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केले जाते. त्यांच्याकडून यजमान देशांमधील सुरक्षा समस्यांबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना भारतीय मिशन/पोस्टमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि नियमितपणे कनेक्ट राहण्यासाठी सल्ला दिला जातो. तसेच, भारतीय मिशन्स/पोस्ट्स वरील पद्धतीचा वापर स्वैच्छिक नोंदणीद्वारे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी करतात, अशी माहिती सुद्धा कीर्ती वर्धन सिंग यांनी दिली.
 

Web Title: Over 13 lakh Indian students pursuing higher studies abroad in 2024: Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.