रिअल इस्टेटला घरघर; ८ वर्षांपासून देशातील २.२ लाख घरांचं बांधकाम रखडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:02 AM2019-08-16T10:02:42+5:302019-08-16T10:03:27+5:30

रखडलेल्या घरांचं एकूण मूल्य १.५६ लाख कोटी

Over 2 Lakh Flats Launched In 2011 Are Incomplete Says jll india Report | रिअल इस्टेटला घरघर; ८ वर्षांपासून देशातील २.२ लाख घरांचं बांधकाम रखडलं

रिअल इस्टेटला घरघर; ८ वर्षांपासून देशातील २.२ लाख घरांचं बांधकाम रखडलं

Next

नवी दिल्ली: देशाच्या ७ प्रमुख शहरांमधील २.२ लाख घरांचं बांधकाम २०११ पासून रखडलं आहे. या घरांची एकूण किंमत १.५६ लाख कोटी रुपये आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट जेएलएल इंडियानं देशातील रखडलेल्या घरांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दिल्ली-एनसीआरमधील रिअल एस्टेट प्रकल्पांची काम अतिशय संथ गतीनं सुरू आहेत. देशातील रखडलेली ७१ टक्के घरं दिल्ली-एनसीआर भागातील आहेत. 

देशाच्या ७ प्रमुख शहरांमधील एकूण २,१८,३६७ घरांचं बांधकाम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. या घरांचं एकूण मूल्य १,५५,८०४ कोटी रुपये आहे. दिल्ली-एनसीआरसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद आणि पुणे या शहरांमधील घरांची बांधकामंदेखील रखडली आहेत. रखडलेल्या २.२ लाख घरांपैकी जवळपास ३० हजार घरांशी संबंधित प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. 

दिल्ली-एनसीआरमधील १,५४,०७५ घरांचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. या घरांची एकूण किंमत ८६,८२४ कोटी रुपयांच्या घरात आहे. तर मुंबईत ५६,४३५ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ४३,४४९ घरांची कामं अपूर्ण आहेत. जेएलएलच्या आकडेवारीनुसार, देशातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी ९१ टक्के प्रकल्प मुंबई, दिल्ली-एनसीआरमधील आहेत. 

चेन्नईतील ८,१३१ घरांचं बांधकाम रखडलं आहे. त्यांचं मूल्य ४,४७४ कोटी रुपये आहे. तर बंगळुरूमधील ५,४६८ घरांची काम संथ गतीनं सुरू असून त्यांची किंमत २,७६८ कोटी रुपये इतकी आहे. पुण्यातील ४,७६५ घरांचं काम रखडलं आहे. त्यांचं बाजारमूल्य ३,७१८ कोटी रुपये आहे. हैदराबादमधील २,०९५ घरांचं काम बांधकाम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. या घरांची एकूण किंमत १,२९७ कोटी रुपये आहे. तर कोलकातामधील ३८४ घरांचं काम रखडलं आहे. त्यांची किंमत २२८ कोटी रुपये आहे. 
 

Web Title: Over 2 Lakh Flats Launched In 2011 Are Incomplete Says jll india Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.