पारोळ्यात ७० हजारांचा तंबाखुजन्य साठा जप्त
By admin | Published: November 3, 2015 11:45 PM2015-11-03T23:45:30+5:302015-11-03T23:45:30+5:30
प्रादेशिकसाठी
Next
प रादेशिकसाठीजळगाव: पारोळा येथे प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थांचा ६९ हजार १५० रुपयांचा माल जप्त करुन व्यापार्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखे तर्फे करण्यात आली.प्राप्त माहिती नुसार, पारोळ्यातील पान मसाल्यांचे व्यावसायिक भरत अशोक जैन यांनी प्रतिबंधित पान मसाला ३७७ पाकिटे, तंबाखु ३७७पाकिटे, मिराज तंबाखु ४० पाकिटे व स्विट सुपारीचे ११५ पाकिटे असा ६९हजार १५० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा घरात अवैध साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्त कारवाई केली.या पथकात अन्न व प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डी.के.सोनवणे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहय्यक फौजदार निलकंठ पाटील, नुरोद्दीन शेख,काँ मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, पोलीस नाईक ईश्वर सोनवणे, मनिष दुसाने, योगेश पाटील यांचा समावेश होता.या बाबात पारोळा पोलीसात डी.के.सोनवणे यांच्या फियादी नुसार भरत जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहे.