धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:45 PM2019-03-25T13:45:23+5:302019-03-25T13:46:00+5:30
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षं 2004-05मध्ये पाच कोटी ग्रामीण महिलांनानोकरी गमवावी लागली होती. 2011-12नंतर महिला सहभागामध्ये 7 टक्क्यांची घट झाली असून, जवळपास 2.8 कोटी महिला नोकरीच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं केलेल्या (PLFS) 2017-18च्या रिपोर्टनुसार, 15 ते 59 वर्षांच्या मधील महिलांमध्ये नोकरी गमावण्याचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महिलांची भागीदारी 2004-05मध्ये 49.5 टक्क्यांहून कमी होऊन 2011-12मध्ये 35.8 टक्के आहे. 2017-18मध्ये ती संख्या घटून 24.6 टक्क्यांवर आली आहे. 2004-05मध्ये महिलांचं काम करण्याचं वय कमी झालेलं आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका तज्ज्ञानंही यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. परंतु सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे महिलांच्या नोकऱ्यांमध्ये कमी आलेली आहे. 2017-18च्या सहा वर्षांत महिलांचा सहभाग 0.4 टक्क्यानं वाढला आहे. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये 12 लाख महिलांचा समावेश आहे.
2011-12 आणि 2017-18मध्ये ग्रामीण भारतात जवळपास 3.2 कोटी मजुरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, जे गेल्या सर्वेक्षणामध्ये 29.2 टक्के होती. नोकरी गमावणाऱ्या लोकांमध्ये जवळपास 3 कोटी शेतकरी आहेत. एनएसएसओद्वारा जारी पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे(पीएलएफएस) 2017-18ची एक रिपोर्टनुसार, 2011-12मध्ये शेती करणाऱ्यांमध्येही 40 टक्के घट नोंदवली गेली आहे.