सशस्त्र पोलीस दलात लाखाच्या वर जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:21 AM2020-09-22T06:21:54+5:302020-09-22T06:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) ...

Over one lakh vacancies in the Armed Police Force | सशस्त्र पोलीस दलात लाखाच्या वर जागा रिक्त

सशस्त्र पोलीस दलात लाखाच्या वर जागा रिक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.
राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.

Web Title: Over one lakh vacancies in the Armed Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.