वर्षानुवर्षे नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा सामना

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:45+5:302016-03-11T22:26:45+5:30

नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.

Over the years, the water shortage faced by Nashirabadkar has been a problem | वर्षानुवर्षे नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा सामना

वर्षानुवर्षे नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा सामना

Next
िराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.
गावाला पाणीपुरवठा होणारे जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने यंदा जानेवारीपासून पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी आल्या. त्यासाठी मंत्रालयापर्यंत धावही घेण्यात आली. लवकरच एमआयडीसीचे पाणी मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्याचा मुहूर्त केव्हा? हे त्यांनाच ठाऊक.
दरम्यान, गावाच्या वाढत्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारींनी त्यास मंजुरी दिल्याने वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यातच विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे विद्युत पंप जळाले. त्यामुळे टंचाईत अधिक भर पडली. ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती वाढली. त्यातच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. नवीन वीजपंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत झाला. बेळी येथे स्वतंत्र वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर बसविण्यासंदर्भात वीज कंपनीला ग्रामपंचायतीने निवेदन दिले असून लवकरच त्यासंदर्भात काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
सुमारे १७ कोटी रुपयांचे जलशुध्दीकरण पाणी योजनेचे काम सुरू आहे. यंदाही शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
चौकट-
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नशिराबादकरांना पाणीटंचाई पाचवीलाच पुजली आहे. गावातील मतदारांनी ग्राम पंचायतींपासून जिल्हा परिषदेसह केंद्रात प्रतिनिधीत्व केले आहे. असा इतिहास असताना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांचे बोल-
राजकारण करु नका
नशिराबादकरांना मोठमोठे राजकीय पद मिळूनही पाणीटंचाई समस्या सोडविण्यात असमर्थ ठरले हे दुर्दैवच आहे. पाण्यासाठी राजकारण करुन नये, लोकप्रतिनिधींनी एकत्र पाणी समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.
-प्रा.अरुण पाटील
पाणी रे पाणी
आज नशिराबाद म्हटले की, पाणी रे पाणी असे जणू आता समीकरणच होऊ पाहत आहे. पाणीटंचाई कधी मिटेल हे देवालाच ठाऊक! पाणीप्रश्नी सर्वांनी ठाम प्रयत्न करावे हीच अपेक्षा.
-संजय देवीदास चौधरी
दिशाभूल करु नका
पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हतबल झाले असून आता समस्या सुटली, पाणी मिळाले असे प्रकारची दिशाभूल ग्रामस्थांच करु नका, कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावे.
-गणपत सोमा पाटील

Web Title: Over the years, the water shortage faced by Nashirabadkar has been a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.