जादा सामान पकडले गेल्यास लागणार सहापट लगेज चार्ज! रेल्वेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:16 AM2018-06-06T02:16:13+5:302018-06-06T02:16:13+5:30
दरवर्षी सुटीनिमित्त सहकुटुंब कुठेतरी जाणे होतेच. रेल्वे प्रवासात तर जो-तो सोबत बरेच सामान घेऊन निघतो. जादा सामानासाठी लागणाऱ्या लगेज चार्जबाबत कुणी फार गंभीरपणे विचार करीत नसते.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : दरवर्षी सुटीनिमित्त सहकुटुंब कुठेतरी जाणे होतेच. रेल्वे प्रवासात तर जो-तो सोबत बरेच सामान घेऊन निघतो. जादा सामानासाठी लागणाऱ्या लगेज चार्जबाबत कुणी फार गंभीरपणे विचार करीत नसते. परंतु यापुढे प्रवासात असा बिनधास्तपणा केला तर अंगाशी येऊ शकते. तुमच्याजवळ दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान जर आढळले तर रेल्वे प्रवाशाकडून त्यावर सहापट लगेज चार्ज आकारणार आहे.
खरे तर यासाठी रेल्वेने कोणताही नवा नियम तयार केलेला नाही. परंतु मर्यादेपेक्षा जादा सामान आणणाºया प्रवाशांमुळे त्रस्त झालेल्यांकडून रेल्वेकडे असंख्य तक्रारी आल्याने रेल्वेला आपल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. जादा सामानावर दंड आकारण्याबाबत रेल्वेने ३० वर्षांपूर्वीच कायदा केलेला आहे. त्यानुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा सोबत आणलेल्या जादा सामानावर सहापट लगेज चार्ज लावला जाणार आहे.
काय आहे कायदा?
प्रचलित कायद्यानुसार
स्लीपर क्लासमधून जाणाºया प्रवाशाला सोबत ४० किलो तर दुसºया वर्गातून जाणाºयास ३५ किलोचे सामान सोबत घेता येते. यासाठी त्यांना कोणताही लगेज चार्ज द्यावा लागत नाही.
तसेच स्लीपर क्लासमधून सोबत जास्तीत जास्त ८० किलो तर दुसºया वर्गातून ७० किलो सामान अधिक चार्ज भरल्यानंतर घेता येते. हे अधिकचे सामान मालडब्ब्यात ठेवावे लागते. ही माहिती रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी संचालक वेद प्रकाश यांनी दिली.
पेटी वा सुटकेस ठरलेल्या आकाराचीच असावी
सामान पॅक करण्यासाठी वापरली जाणारी पेटी, सुटकेस किंवा बॉक्सचा आकारही रेल्वेने ठरवून दिला आहे. याची लांबी, रुंदी आणि उंची १०० ७ ६० ७ २५ सेंटीमीटर या प्रमाणात असावी, असे सांगण्यात आले आहे. बॉक्सचा आकार कोणत्याही प्रकारे दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यासाठी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.