ओवेसींनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकवावा; भाजपा मुख्यमंत्र्यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:46 AM2019-12-23T10:46:04+5:302019-12-23T10:47:19+5:30
ओवेसींनी लोकांना निषेध नोंदवायला सांगितला होता.
अंबाला : एनआरसी आणि सीएए कायद्यावरून देशभरात हिंसाचार उफाळलेला असताना आता भाजपा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक् युद्ध रंगले आहे. या कायद्यांविरोधात असलेल्यांनी त्यांच्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून निषेध नोंदविण्याचे आवाहन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते. याला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आव्हान दिले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसीच्या विरोधात सुरू असलेला लढा हा केवळ मुस्लिमांचा नाही तर दलित, अनुसूचित जाती-जमातीतील लोकांचाही आहे. जनतेने राज्यघटना बचाव दिन पाळायला हवा. मी देशद्रोही असल्याचे आरोप केले जातात. मी जन्माने व कर्माने भारतीय आहे हे कोणीही विसरू नये असेही ओवेसी यांनी यावेळी म्हटले होते.
यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी टीका केली आहे. ओवेसी जर त्यांच्या घरावर तिरंगा फडकवत असतील तर त्यांनाही काही सद्बुद्धी येईल. तिरंगा नेहमी देशभक्तीची भावना जागृत करतो, मग तो ओवेसी असो की आणखी कोणी, अशी टीका केली आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने नेमली चौकशी समिती
अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये १५ व १६ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांची चौकशी करण्यासाठी या विद्यापीठाने छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. के. गुप्ता यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. कुलगुरू तारिक मन्सूर यांनी सांगितले की, हिंसक निदर्शने कोणत्या कारणांमुळे झाली याची कारणे उजेडात आली पाहिजेत.