ओवैसींनी काढला मोदींचा बाप
By admin | Published: July 4, 2017 01:09 AM2017-07-04T01:09:58+5:302017-07-04T01:09:58+5:30
मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पाटीर्चे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पाटीर्चे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा वादात आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्युनिअर अकबरुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते मुस्लिमांना धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना अपशब्दही वापरले आहेत.
व्हिडीओमध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी अखलाक, जुनैद आणि अन्य दुसऱ्या मुस्लिमांच्या हत्या आणि होणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. देशातील सगळे धर्मनिरपेक्ष लोक कुठे आहेत, असा सवालही यानिमित्ताने ते विचारत आहेत.
ओवैसी यांनी विचारले आहे की, ‘मुस्लिमांना समान दर्जा नाही का ? म्हणूनच त्यांच्यासोबत असा व्यवहार केला जात आहे का ? डोक्यावर टोपी घालणे, दाढी ठेवणे किंवा मुस्लीम असणे गुन्हा आहे का ?’
ओवैसी यांनी म्हटले आहे की, ‘‘ए विश्व हिंदू परिषद, नरेंद्र मोदी... हा देश तुमच्या बापाची मालमत्ता नाही. जेवढा हा देश तुमचा आहे, तेवढाच माझाही आहे.’’