काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या; असदुद्दीन ओवैसींचं अजब तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:44 AM2020-01-14T10:44:36+5:302020-01-14T10:46:38+5:30
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
नवी दिल्लीः एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मत मात्र मलाच द्या, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं आहे. तसेच तेलंगणामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर स्थानिकांना त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचं अपील केलं आहे. काँग्रेसच्या लोकांजवळ भरपूर पैसा आहे. तो त्यांच्याकडून मिळवा. तो पैसा माझ्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या आणि फक्त मला मतदान करा. जर तुम्हाला ते लोक पैसे देत असतील तर घ्या, काँग्रेसनं आपला दरही वाढवला पाहिजे. माझी किंमत फक्त दोन हजार ठरवू नये, मी त्याहून अधिक मूल्यवान आहे, असा टोलाही ओवैसींनी काँग्रेसला हाणला आहे.
12 जानेवारीला तेलंगणातल्या भैंसामध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. ज्यात 13 घरं आणि 26 वाहनं जळून बेचिराख झाली होती. या घटनेसंदर्भातही ओवैसींनी यांनी निषेध नोंदवला आहे. ओवैसी म्हणाले, ही घटना निषेधार्ह होती. मी मुख्यमंत्र्यांकडे अपील करतो की, आरोपींविरोधात कारवाई करा, ज्या लोकांचं नुकसान झालं आहे, त्यांना लवकरात लवकर भरपाई द्या. तसेच भैंसाच्या जनतेनंही शांतता कायम ठेवावी, असं अपीलही त्यांनी केलं आहे.
तर एनआरसीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पहिल्यांदा सरकारने एनआरसी लागू करणे गरजेचे होते. सरकार देशातील १२० कोटी जनतेला रांगेत उभं करणार आहे आणि त्यानंतर त्यांना कागदपत्रे मागणार आहे. हिंदूंना वाटतं म्हणून देश धर्मनिरपेक्ष नाही तर संविधानाने देशाला सेक्युलर बनवले आहे. संविधानाच्या अधीन राहून जे निर्णय होतात तसे त्याला आव्हान देण्याचा अधिकारही संविधानाने दिला आहे असं असदुद्दीने ओवैसी यांनी सांगितले. नागरिकता धर्म या चर्चासत्रादरम्यान, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाद रंगला होता. एकीकडे मुख्तार अब्बास नकवी सरकारने आणलेल्या विधेयकाचे जोरदार समर्थन करत होते तर असदुद्दीने ओवैसी सरकारच्या कायद्याविरोधात त्रुटी काढत होते.Asaduddin Owaisi, on violence in Telangana's Bhainsa: Yesterday's incident is condemnable. I demand the CM to take action against all culprits. I also demand him to provide compensation to everyone who suffered losses. I appeal to the people of Bhainsa to maintain peace. (13.01) https://t.co/Ys4vVnx2fg
— ANI (@ANI) January 14, 2020