ओवैसींनी काढला नरेंद्र मोदींचा बाप
By admin | Published: July 3, 2017 04:33 PM2017-07-03T16:33:40+5:302017-07-03T17:51:10+5:30
औवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते मुस्लिमांना धर्माच्या आधार मतदान करण्याचं आवाहन करत आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीम पार्टीचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा वादात आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्युनिअर अकबरुद्दीन औवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते मुस्लिमांना धर्माच्या आधार मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना अपशब्दही वापरले आहेत. विशेष म्हणजे असदुद्दीन ओवैसी नेहमीच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर धार्मिक राजकारण करत असल्याचा आरोप करत असतात.
व्हिडीओमध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी अखलाक, जुनैद आणि अन्य दुस-या मुस्लिमांच्या हत्या आणि होणा-या हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. देशातील सगळे धर्मनिरपेक्ष लोक कुठे आहेत ? असा सवालही यानिमित्ताने ते विचारत आहेत.
ओवैसी यांनी विचारलं आहे की, "मुस्लिमांना समान दर्जा नाही का ? म्हणूनच त्यांच्यासोबत असा व्यवहार केला जात आहे का ? डोक्यावर टोपी घालणे, दाढी ठेवणे किंवा मुस्लिम असणं गुन्हा आहे का ?"
पुढे बोलताना ओवैसी यांनी गरळ ओकत म्हटलं आहे की, "ए विश्व हिंदू परिषद, नरेंद्र मोदी...हा देश तुमच्या बापाची मालमत्ता नाही. जेवढा हा देश तुमचा आहे, तेवढाच माझाही आहे". ओवेसी पुढे म्हणतात, "कोणाचे उपकार, मदतीची आम्हाला गरज नाही. मुसलमानांनी ठरवलंच, जर ते उभे राहिलेच तर आमचे मुसलमान भाऊ, आपल्या मुसलमान भावांना मतदान करुन, देशभरात 50 खासदार निवडून आणू शकतात".