रशियामध्ये धडाडणार भारताचे टी-90 रणगाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 02:34 PM2017-08-07T14:34:19+5:302017-08-07T14:37:12+5:30

यंदा प्रथमच भारत टी-90 रणगाड्यांसह स्पर्धेत सहभाग घेत आहे. 29 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये या स्पर्धा होत आहेत. 28 देशांनी यामध्ये सहभाग घेतला असून या देशांचे 4000 जवान त्यासाठी रशियामध्ये आलेले आहेत.

With own T-90 tanks, Indian Army participates in Tank competition in Russia | रशियामध्ये धडाडणार भारताचे टी-90 रणगाडे

रशियामध्ये धडाडणार भारताचे टी-90 रणगाडे

googlenewsNext
ठळक मुद्दे रशियामधील अलाबिनो रागांमध्ये आंतरराष्ट्रीय लष्कर स्पर्धांचे 2013 पासून आयोजन करण्यात येते. त्यामध्ये द टॅंक बायथलॉन ही स्पर्धा देखिल असते. 29 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये या स्पर्धा होत आहेत. 28 देशांनी यामध्ये सहभाग घेतला असून या देशांचे 4000 जवान त्यासाठी रशियामध्ये आलेले आहेत.

नवी दिल्ली, दि.7- भारताचे टी-90 रणगाडे आता रशियामध्ये धडाडणार आहेत. रशियामधील अलाबिनो रागांमध्ये आंतरराष्ट्रीय लष्कर स्पर्धांचे 2013 पासून आयोजन करण्यात येते. त्यामध्ये द टॅंक बायथलॉन ही स्पर्धा देखिल असते. 2014 पासून भारत या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. यंदा प्रथमच भारत टी-90 रणगाड्यांसह यामध्ये सहभाग घेत आहे. 29 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये या स्पर्धा होत आहेत. 28 देशांनी यामध्ये सहभाग घेतला असून या देशांचे 4000 जवान त्यासाठी रशियामध्ये आलेले आहेत.

मागील वर्षी 17 देशांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये भारताला 6 वा क्रमांक प्राप्त झाला होता. आता यावर्षी भारत प्रथमच टी-90 रणगाड्यांसह रशियाला गेला असून हे रणगाडे समुद्रमार्गे रशियाला पोहोचले आहेत. तर रशिया त्यांच्या टी72बी3एम आणि चीन टाइप 96 रणगाड्यानिशी स्पर्धेत उतरलेले आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूची निवड शारीरिक, मानसिक आणि तंत्रज्ञानाचे असणारे ज्ञान याची पारख करुन केली जाते. टॅंक बायथलॉनमध्ये 19 देशांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये चीन, रशिया, कझाखस्तान, मंगोलिया, आर्मेनिया, अंगोला, थायलंड, युगांडा, इस्रायल, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारताच्या रणगाड्यांनी झाशीजवळ बाबिना येथे सराव केला आहे.

टी-90 रणगाडे

भारताने 2001 साली रशियाकडून टी-90एस हे 310 रणगाडे विकत घेतले. त्यातील 124 रणगाडे आधी पाठविण्यात आले. त्यानंतर सुटे भाग टप्प्याने येत 186 रणगाडे भारतामध्ये जोडण्यात आले. भारत आज टी-90 चे बहुतांश सुटे भाग स्वतःच तयार करतो. भारताने या प्रकारामधील अर्जुन आणि भीष्म हे रणगाडे तयार केलेले आहेत. टी-90 रणगाड्यांचे वजन 46 टन असते, लांबी 9.63 मीटर्स, रुंदी 3.78 मीटर्स आणि उंची 2.22 मीटर्स असते. 60 किमी प्रतिताशी वेगाने ते चालू शकतात. अर्जुन मार्क 2 हा रणगाडा प्रतीमिनिट दहा राऊंडस फायर करु शकतो. भारतीय लष्कराकडील बहुतांश रणगाडे हे परदेशी बनावटीचे आहेत. लष्कराच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांची निर्मिती सुरू केली. यापैकी एक अर्जुन रणगाडा. या रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारा दारूगोळा हा इतर रणगाड्यांसारखाच असल्याने, त्याची मारक क्षमता वाढत नव्हती. अत्याधुनिक रणगाड्यांंसाठी अत्याधुनिक आणि जास्त सक्षम, जास्त मारक क्षमता असलेली स्फोटके तयार करण्यासाठी संशोधन करण्याची जबाबदारी डीआरडीओच्या अंतर्गत येणाऱ्या एआरडीई व एचईएमआरएल या संस्थांकडे सोपविण्यात आली. त्यांनी संशोधन करून अत्याधुनिक स्फोटकांची निर्मिती केली. ही स्फोटके अर्जुन रणगाड्यांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आल्याने, त्यांची क्षमता कित्येक पटींनी वाढली आहे.

Web Title: With own T-90 tanks, Indian Army participates in Tank competition in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.