Oxygen Express: दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:15 PM2021-04-22T15:15:02+5:302021-04-22T15:17:01+5:30

oxygen express: 'राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली.

oxygen express arrived at rinl visakhapatnam site to get liquid medical oxygen for maharashtra | Oxygen Express: दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार

Oxygen Express: दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार

googlenewsNext
ठळक मुद्देऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचलीप्रक्रियेसाठी २० - २४ तास लागू शकतातलवकरच महाराष्ट्रात परतणार

विशाखापट्टनम: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा अधिकच उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय, कोरोना लसी, रेमडेसिवीर, बेड्सची संख्याही अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अखेर विशाखापट्टनमला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा 'ऑक्सिजन एक्सप्रेस'द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. (oxygen express arrived at rinl visakhapatnam site to get liquid medical oxygen for maharashtra)


'राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे. प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सर्व टँकरमध्ये १५ ते २० टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळेस महाराष्ट्राला १०० टनाहून अधिक ऑक्सिजन मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. 

प्रक्रियेसाठी २० - २४ तास लागू शकतात

प्रोटोकॉलनुसार, टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी, वजन करण्यासाठी तसेच सुरक्षेची खात्री करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी २०-२४ तास लागू शकतात. त्यानंतरच ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना होणार आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टनम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. 

एसटी बस आता केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच; अनिल परब यांनी केले स्पष्ट

ऑक्सिजन निर्मितीचे पाच युनिट कार्यरत

विशाखापट्टनम स्टील प्लान्टमध्ये 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पाच युनिट कार्यरत आहेत. यातील तीन युनिटची क्षमता ५५० टन तर दोन युनिटची क्षमता ६०० टन प्रतिदिन आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 'एअर सेपरेशन प्लान्ट'मध्ये २६०० टन ऑक्सिजन गॅस आणि १०० टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार

दरम्यान, बोकारोहून लिक्विड ऑक्सिजन भरण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसला लखनऊहून बोकारोला पाठवण्यात येत आहे. यामुळे उत्तर प्रदेशला ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकेल. मध्य प्रदेशकडून केली जाणारी ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता इथेही ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात येईल. काही दिवसांत आणखीन अशा स्पेशल रेल्वेचे संचालन सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
 

Web Title: oxygen express arrived at rinl visakhapatnam site to get liquid medical oxygen for maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.