Oxygen Shortage: “कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 09:03 PM2021-04-25T21:03:47+5:302021-04-25T21:06:40+5:30

Oxygen Shortage: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंबानींसह देशातील बड्या उद्योगजकांना पत्र लिहिले आहे.

oxygen shortage cm arvind kejriwal wrote letter to industrialists for oxygen supply | Oxygen Shortage: “कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र

Oxygen Shortage: “कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र

Next
ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांची कळकळीची विनंतीऑक्सिजनसाठी देशातील बड्या उद्योगपतींना पत्रमुंकेश अंबानींसह अनेक दिग्गजांच्या नावाचा समावेश

 नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. राज्य सरकारकडून केंद्राला यासंदर्भात अनेकदा मागणी केली जात आहे. केंद्राकडूनही काही प्रमाणात मदत केली जात सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंबानींसह देशातील बड्या उद्योगजकांना पत्र लिहिले आहे. (oxygen shortage cm arvind kejriwal wrote letter to industrialists for oxygen supply)

दिल्लीला ऑक्सिजन मिळण्यासाठी तसेच पुरवठा सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिलायन्सचे इंडस्ट्रिजचे मालक मुकेश अंबानी यांच्यासह देशातील बड्या उद्योगपतींना पत्र लिहिले आहे. अंबानी यांच्यासह रतन टाटा, आदित्य बिर्ला, राहुल बजाज, आनंद महिंद्रा, हिंदुजा ब्रदर्स यांसह अनेक उद्योजकांचा समावेश आहे. 

केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

अरविंद केजरीवाल यांची कळकळीची विनंती

देशातील या बड्या उद्योजकांना पत्र लिहून केजरीवाल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात आवाहन केले आहे. तुमच्याकडे ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनचा टँकर असल्यास दिल्ली सरकारची मदत करावी. आपल्याकडून जे काही होऊ शकेल, ते आवर्जुन करावे, अशी कळकळीची विनंती केजरीवाल यांनी या पत्रातून केली आहे. तसेच यापूर्वीही केजरीवाल यांनी अन्य राज्य सरकारांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याविषयी आवाहन केले होते. 

ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

केंद्रातील मोदी सरकारकडून महत्वाचा निर्णय

देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

दरम्यान, सरकारी रुग्णालयात वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यामागे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय यामागे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. मागणी एवढा ऑक्सिजन पुरवठा नियमित सुरू राहील, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: oxygen shortage cm arvind kejriwal wrote letter to industrialists for oxygen supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.