उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:51 PM2021-05-13T20:51:01+5:302021-05-13T20:52:12+5:30

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे.

oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi | उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

Next

Coronavirus Updates UP: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न देखील मोठा झाला आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमावावा लागल्याची देखील प्रकरणं घडली आहेत. अशातच उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे.  उत्तर प्रदेश सरकारमधील अप्पर मुख्य गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी 'आज तक' या हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीत त्यांनी राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरुपी निकालात लागल्याची माहिती दिली आहे. (oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi)

२३ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशात ३८० मेट्रीक टन ऑक्सिजन होता. ज्यात आज वाढ होऊन ११ मे रोजी १०१५ मेट्रीक टन इतका झाला असल्याची आकडेवारी अवस्थी यांनी राज्यानं खास तयार केलेल्या कंट्रोल रुमच्या हवाल्यानं सादर केली. याशिवाय दैनंदिन गरज भागवून दोन दिवसांचा अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. 

संपूर्ण उत्तर प्रदेशात कोणत्याही रुग्णालयात आता ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारच्या माहितीनुसार ३ मे पासून जेव्हा रेल्वेच्या मदतीनं ऑक्सिजन टँकर आणण्याची सुविधा उपलब्ध झाली तेव्हापासून उत्तर प्रदेश सरकारनं हळूहळू राज्याची ऑक्सिजनी गरज पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आणि आज राज्यात १ हजार मेट्रीक टनपेक्षाही अधिक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

अवनीश अवस्थी यांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. ६१ टँकरपासून सुरू झालेलं अभियान आज ९१ टँकरपर्यंत पोहोचलं आहे. हे टँकर राज्यात सध्या अविरत ऑक्सिजन पोहोचविण्याचं काम करत आहेत. रेल्वे मंत्रालय राज्यासाठी देवदूत ठरलं असून त्यामुळे जमशेदपूर, ओडिसा, प.बंगाल आणि झारखंड सारख्या विविध ठिकाणांहून ऑक्सिजन आणण्याचं काम सोपं झाल्याची माहिती अवस्थी यांनी दिली आहे. 

Web Title: oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.