Oxygen Shortage: दिलासा! गुजरातमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली; गोयल यांचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 09:50 PM2021-04-25T21:50:26+5:302021-04-25T21:54:19+5:30
Oxygen Shortage: गुजरातमधील हापा येथून कळंबोलीसाठी आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे.
अहमदाबाद: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेत देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टनमनंतर आता गुजरातमधूनमहाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली आहे. (oxygen shortage oxygen express departed from hapa gujarat to maharashtra)
देशभरातील राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे ऑक्सिजनचा साठा अपुरा पडत आहे. सर्वप्रथम विशाखापट्टनम येथून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात आली. अलीकडेच ती महाराष्ट्रात पोहोचली असून, आता गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती देत ऑक्सिजन एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गुजरात के हापा से महाराष्ट्र के कलंबोली के लिए, लिक्विड मेडिकल ऑक्सीजन लेकर एक ऑक्सीजन एक्सप्रेस चल पड़ी है।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 25, 2021
यह एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्र में ऑक्सीजन की उपलब्धता को बढ़ाएगी, जिससे कोरोना के खिलाफ लड़ाई में सहायता मिलेगी। pic.twitter.com/Iw4qtlnJQT
गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली
गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे. ही एक्स्प्रेस ट्रेन महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेला वाढवेल. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यास मदत होईल, असे पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र
११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन मिळणार
विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली होती. यापैकी ३ टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आले आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून ५ दिवसांत ११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. यापुढील काळातही ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस
दरम्यान, देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.