Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:54 PM2021-04-22T16:54:08+5:302021-04-22T16:57:06+5:30

Oxygen Shortage: रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

oxygen shortage in varanasi hospital and dm said do not recruit new patients | Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

googlenewsNext
ठळक मुद्देPM मोदींच्या वाराणसीत ऑक्सिजन टंचाईजिल्हाधिकाऱ्यांचे रुग्णालयांना निर्देश३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

वाराणसी: संपूर्ण देशभरात एकीकडे कोरोनाची परिस्थिती भयावह होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट उभे ठाकले असून, ते गंभीर होताना पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा जलदगतीने व्हावा, यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे. यातच पंतप्रधाननरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वारणासीमध्ये केवळ १० तास म्हणजचे सायंकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक असून, रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. (oxygen shortage in varanasi hospital and dm said do not recruit new patients)

कोरोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सर्व खासगी रुग्णालयांसाठी निर्देश जारी केले आहेत. दुपारी १२ वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगितले गेले होते. याचाच अर्थ केवळ सायंकाळपर्यंत ऑक्सिजन पुरेल, एवढाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. 

भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे. 

३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसी जिल्ह्यात दररोज जवळपास ३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होत असतो. मात्र, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे रिफिलिंग करून पुन्हा रुग्णालयांना दिला जात आहे. 

 दिलासा! ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टनमला पोहोचली; लवकरच महाराष्ट्रात परतणार

उच्च न्यायालयाने टोचले केंद्राचे कान

ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करणे ही जबाबदारी पूर्णपणे केंद्र सरकारच्या खांद्यावर असून, आवश्यकता भासल्यास पोलाद व पेट्रोलियम यांच्यासह उद्योगांना होणारा संपूर्ण पुरवठा वैद्यकीय कारणासाठी वळवला जाऊ शकतो, असे न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. आपल्या पोलाद प्रकल्पांसाठी तयार करत असलेला प्राणवायू टाटा वैद्यकीय उपयोगासाठी वळवू शकत असतील, तर इतर लोक का नाही? ही लोभाची सीमा आहे. माणुसकीची काही जाणीव उरली आहे की नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले. 
 

Web Title: oxygen shortage in varanasi hospital and dm said do not recruit new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.